Hansika And Sohail After Wedding Party Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hansika-Sohail Video: आफ्टर वेडिंग पार्टीत हंसिका-सोहेलने धरला ठेका, हुक स्टेप्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरियाचा आफ्टर वेडिंग पार्टीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Pooja Dange

Hansika And Sohail Marriage: अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया हे काल म्हणजे ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर आता त्यांच्या आफ्टर वेडिंग पार्टीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हंसिका आणि सोहेल आलिया आणि रणबीर यांच्या 'केसरीया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये हंसिकाने हिरव्या रंगाच्या ड्रेसवर काळ्या रंगाचा लेदर जॅकेट घेतला आहे. तर हंसिकाचा नवरा सोहेल यांनी ब्लॅक टक्सिडो घातला आहे.

हंसिकाच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहेत. माता की चौकीने तिच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली. तिच्या लग्नाच्या समारंभामध्ये मेहेंदी आणि हळद तसेच सुफी नाईटचेही आयोजन करण्यात आले होते. या जोडप्याच्या सर्व कार्यक्रमाचे सोशल मीडियावर च्यारलं झाले होते. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये असे दिसत होते की दोघेही त्यांच्या लग्नविधींचा मनापासून आनंद घेत आहेत. काही दिवसांपूर्वी हंसिकाने तिच्या गर्ल गँगसोबत ग्रेसमध्ये बॅचलर पार्टीही साजरी केली होती. (Celebrity)

हंसिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिच्या तिच्या आणि सोहेलच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. हंसिकाने फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवेल्समोरील एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये सोहेल हातात अंगठी घेऊन तिला प्रपोज करताना दिसत होता. हे फोटो शेअर करत हंसिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Now and forever.'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसिका आणि सोहेल यांचे लग्न ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हंसिकाच्या चाहत्यांना तिच्या लग्नातील खास क्षण मोबाईलवर पाहता येणार आहेत. (OTT)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT