Spruha Joshi
Spruha Joshi saam Tv
मनोरंजन बातम्या

Spruha Joshi : जेवलीस का?... कवीमनाच्या स्पृहा जोशीचा हटके रील एकदा बघाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Watch Spruha Joshi Reel | मुंबई: सोशल मीडियावर(Social Media) मुलींसोबत ओळख वाढवण्यासाठी काही यूजर्स जेवलीस का? जेवण झालं का? असे मेसेज करून त्यांच्यासोबत संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक मुलींच्या डीएम बॉक्समध्ये अशा नेटकऱ्यांचे सतत मेसेज येत असतात. याच संकल्पनेवर आधारित अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) एक भन्नाट रील तयार केला आहे. या रीलमध्ये इन्फ्लूएन्सर आणि मीम्स क्रिएटर सुमित पाटीलने तिला सहकार्य केलं आहे.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या 'जेवलीस का, आमचं झालं, तुमचं कधी इतकं बोलून ऑफलाइन जा ना, जेवलीस का?' या नवीन गाण्यावर हा रील बनवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण स्पृहा जोशीला जेवलीस का? असे सतत मॅसेज करत असतो म्हणून ती त्याला ब्लॅाक करते, पण हा तरूण तिला अन्य अॅपवरून जेवलीस का? हाच मेसेज करतो, असे दाखवण्यात आले आहे.

स्पृहा जोशीच्या या रीलवर तिच्या चाहत्यांसोबतच तिचे अनेक मित्र कलाकारही कमेंट करत आहेत. अभिनेता कुशल बद्रीके याने हसण्याचे इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर स्पृहाचे चाहते 'आमच्यासोबतही असचं होतं', असं लिहून हा रील मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या रीलला आतापर्यंत ३४ लाखांहून अधिक लाइक्स आलेले असून, हे रील प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या युट्यूब चॅनलवर असे वेगवेगळे प्रयोग सतत करत असते. हल्लीच तिने आषाढीवारी निमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट केला होता, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. काही दिवसांपूर्वीच स्पृहाच्या युट्यूब चॅनलवर १ लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून यूट्यूबने 'सिल्व्हर बटन' देऊन तिचे कौतुक केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT