Sidhu Moosewala Friend Bunty Bains Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bunty Bains: सिद्धू मुसेवालाचा मित्र आणि म्युझिक कम्पोजर बंटी बेंसवर जीवघेणा हल्ला, रेस्टॉरंटमध्ये केला गोळीबार

Sidhu Moosewala Friend Bunty Bains: या गोळीबाराच्या घटनेनंतर बंटी बेंस यांना धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. बंटी बेंसवर हा हल्ला मोहालीतील सेक्टर-79 मध्ये झाला.

Priya More

Gunshots Fired On Bunty Bains:

पंजाबी संगीत क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिवंगत गायक सिद्धू मूसवालाचा (Sidhu Moosewala) मित्र आणि लोकप्रिय संगीतकार बंटी बेंस (Bunty Bains) याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बंटी आपल्या मित्रांसोबत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञातांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने बंटी बेंस थोडक्यामध्ये बचावला आहे. सध्या तो सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबाराच्या घटनेनंतर बंटी बेंस यांना धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. बंटी बेंसवर हा हल्ला मोहालीतील सेक्टर-79 मध्ये झाला. बंटी बेंसचा दिवंगत गायक सिद्धू मूसवाला याच्याशी खास संबंध आहेत. बंटी हा सिद्धू मूसेवालाचा जीवलग मित्र आहे. बंटी बेंस हा सिद्धू मूसवालाची गाणी रचायचा. दोन वर्षांपूर्वी 29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवाला याच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर बंटी बेंसने सांगितले की, गोळीबारानंतर लगेचच त्याला एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन आला होता. पैसे न दिल्यास जीव गमवावा लागेल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली होती. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लकी पटियाल याच्या नावाने आपल्याला हा कॉल करण्यात आल्याचा खुलासा बंटीने केला आहे. लकी पटियाला सध्या कॅनडामध्ये आहे. लकी पटियाल आणि लॉरेन्स बिश्नोई एकमेकांच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. लकी पटियाला हा बंबीहा या गँगचे नेतृत्व करतो.

जीवघेण्या हल्ल्यात बंटी बेंस सुखरूप वाचला. या हल्ल्यानंतर त्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पंजाब पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बंटी बेंस हा सिद्धू मुसावाला यांचा चांगला मित्र आहे. सिद्धू मूसेवालाची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवालाच्या अनेक गाण्यांचे संगीतकार म्हणून बंटी बेसने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Deol : रणवीर सिंहनंतर सनी देओल गाजवणार बॉक्स ऑफिस, 'धुरंधर २' ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'हा' चित्रपट

Pune Crime : आईने स्वत:च्या बाळाचा जीव घेतला, घराच्या ओट्यावर आपटून सपंवलं; चौकशीत सांगितलं धक्कादायक कारण

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा हादरा; बडा नेता साथ सोडणार, पक्षही निश्चित झाला

Gas Cylinder: मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर, LPG बाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

चुकून दुसऱ्याची चप्पल घातल्याने रक्तरंजित थरार; डोक्यात विटा घालून एकाला संपवलं, नागरपूर हादरलं

SCROLL FOR NEXT