Gulkand SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gulkand : सई ताम्हणकर अन् समीर चौघुले यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर, 'गुलकंद' पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Sai Tamhankar and Samir Choughule : 'गुलकंद' चित्रपटातून पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत.

Shreya Maskar

समीर चौघुले (Samir Choughule) आणि सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar ) 'गुलकंद' (Gulkand ) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले. ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचे पहिल्यांदाच एकत्र काम करणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे.

पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांची उत्तम जोड पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित 'गुलकंद' या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे.

चित्रपटात सईसोबत काम करण्याच्या अनुभवावर समीर चौघुले म्हणाला, "सई आणि माझी ओळख 'फू बाई फू' पासूनची आहे. त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो. परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्य रसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते. त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ ९०० एपिसोड्स तिने पाहिले आहेत. आता 'गुलकंद'च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला. यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे."

पुढे सई ताम्हणकर म्हणाली की, "हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहाणे आणि त्याच्यावर टिप्पणी करणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचे खूप जमते. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल."

'गुलकंद' चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT