Govinda Reaction On Divorce Rumors: घटस्फोटाच्या चर्चेवर गोविंदानं सोडलं मौन, म्हणाला- मी सध्या ...

Govinda- Sunita Ahuja Divorce Rumors : सध्या सोशल मीडियावर गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर गोविंदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Govinda- Sunita Ahuja Divorce Rumors
Govinda Reaction On Divorce RumorsSAAM TV
Published On

सध्या गोविंदा (Govinda ) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा पत्नी सुनीता अहुजासोबत लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि पत्नी सुनीता (Sunita Ahuja) यांच्यात दुरावा आल्याचे बोले जात आहे. गोविंदाचे नाव एका ३० वर्षीय अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्या रंगल्या आहेत. आता यावर गोविंदाने मौन सोडले आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदाच्या कुटुंबाकडून अशी माहिती मिळाली की, गोविंदाला पत्नी सुनीता अहुजाने गोविंदा घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. परंतु त्यानंतर याबाबत काही हालचाल झाली नाही. तर घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाला की, "सध्या मी माझ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे." घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अद्यापही सुनीता आहुजाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

गोविंदाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, "कुटुंबातील इतर काही सदस्यांच्या बोलण्यामुळे यांच्यात मतभेद सुरू आहेत. गोविंदा एका नवीन चित्रपटाची सुरुवात करणार आहेत." गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न 1987 मध्ये झाले आहे. यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत.

गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचा 37 वर्षांचा संसार मोडणार असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. सुनीताने एका मिडिया मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि गोविंदा एकत्र राहत नाही. मी मुलांसोबत फ्लॅटमध्ये राहते आणि गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो.

Govinda- Sunita Ahuja Divorce Rumors
Govinda Divorce : गोविंदा-सुनीताचा घटस्फोट? गोविंदाचा 37 वर्षांचा संसार मोडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com