सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपट आणि प्रतीक गांधीचा 'फुले' चित्रपट एकमेकांना टक्कर देत आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे दोन्ही चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाले आहेत. इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने पहिल्या दिवसापासून संथपणे कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन आता चार दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई (Ground Zero Box Office Collection ) जाणून घेऊयात.
दिवस पहिला- 1.15 कोटी
दिवस दुसरा- 1.90 कोटी
दिवस तिसरा- 2.15 कोटी
दिवस चौथा- 70 लाख
एकूण - 5.90 कोटी
इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' चित्रपट आता लवकरच ओटीटी (Ground Zero OTT Release) घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या रिलीजनंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये 'ग्राउंड झिरो' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप 'ग्राउंड झिरो' ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख समोर आली नाही आहे.
'ग्राउंड झिरो'चित्रपट भविष्यात किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ग्राउंड झिरो'मध्ये इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकली आहे. इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांच्यावर आधारित आहे.'ग्राउंड झिरो' चित्रपटात इमरान हाश्मी, सई ताम्हणकरसोबत ललित प्रभाकर, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना, झोया हुसैन हे कलाकार देखील झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.