Dan Blackman Passes Away: ‘द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो’च्या २०२५ च्या अंतिम भागात स्पर्धकांच्या विजयासोबतच एका हृदयस्पर्शी क्षणाने सर्वांना भावूक केले. या लोकप्रिय शोच्या शेवटी स्क्रीनवर "इन लव्हिंग मेमरी ऑफ डॅन ब्लॅकमन (१९७४-२०२५)"” असा संदेश झळकला शोच्या दीर्घकाळ काम करणाऱ्या संपादक डॅन ब्लॅकमॅन यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॅन ब्लॅकमॅन हे युनायटेड किंगडममधील चेशायर येथील रहिवासी होते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड, ब्रिस्टल येथून इतिहास आणि राजकारण या विषयात शिक्षण घेतले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बीबीसीमध्ये झाली आणि त्यांनी तब्बल १३ वर्षे Planet Earth: The Future, Timeshift यांसारख्या अनेक माहितीपट आणि गैर-कल्पित कार्यक्रमांवर काम केले.
२०११ मध्ये त्यांनी एडिटर म्हणून काम सुरू केले आणि २०१८ मध्ये ते ‘द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो’ (याला ब्रिटनबाहेर The Great British Bake Off म्हणून ओळखले जाते) या कार्यक्रमासाठी काम करायला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी या शोचा आत्मा आणि आपुलकी जपणारा भाव तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ब्लॅकमॅन यांनी ऑटमवॉच, विंटरवॉच, नादियाज एव्हरीडे बेकिंग, चेंजिंग रूम्स आणि द ग्रेट पॉटरी थ्रो डाउनयांसारख्या अनेक प्रसिद्ध शोमध्येही काम केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना एक बुद्धिमान, शांत स्वभावाचा आणि उत्कृष्ट एडिटर म्हणून गौरवले. एडिटर जुलिया फूट यांनी त्यांच्याबद्दल “तो अत्यंत दयाळू आणि हुशार व्यक्ती होता” असे सांगितले.
त्यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या टीव्ही उद्योगात दु:खाची लाट पसरली. चेशायर येथे त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर ब्रिस्टलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम ठेवण्यात आला. शोच्या निर्मात्यांनी अंतिम भागात त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली देऊन त्यांच्या कार्याला खरी ओळख दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.