partner 2 movie Google
मनोरंजन बातम्या

Govinda : ‘पार्टनर 2’ मध्ये सलमानसोबत गोविंदा कॉमेडीचा तडका लावणार? सुनीता आहूजा म्हणाली....

Govinda Movie : गोविंदाच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची प्रत्येकजण वाट पाहत आहे. अलीकडेच गोविंदाची पत्नी सुनीताने गोविंदा सलमान खानसोबत 'पार्टनर 2' या चित्रपटातून कमबॅक करण्यावर भाष्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Govinda : गोविंदा बराच काळ चित्रपटापासून दूर आहे. ९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर गोविंदाचा बोलबाला होता. त्यांचे चित्रपट आणि गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. आताही लोकांना त्यांचे जुने चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला आवडतात. २००७ मध्ये, कॉमेडी-रोमँटिक ड्रामा फिल्म पार्टनर रिलीज झाला. या चित्रपटात सलमान खान आणि गोविंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. सलमान-गोविंदाच्या या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले होते. अलीकडेच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, पार्टनर २ मध्ये सलमानसोबत तिचा नवरा पडद्यावर परतावा अशी तिची इच्छा आहे का?

या प्रश्नाचे उत्तर देताना सुनीता म्हणाली की ही चांगली कल्पना आहे कारण प्रेक्षकांना त्यांचे एकत्र काम आवडले आहे. अलीकडेच सुनीता आहुजाने एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, गोविंदाच्या सलमान खान सोबतच्या कमबॅकबद्दल ती म्हणाली, त्याचा मागील चित्रपट पार्टनर हा चांगला चित्रपट होता. त्यामुळेच या दोन्ही कलाकारांनी पार्टनर २ मध्ये एकत्र काम करावे अशी माझी इच्छा आहे.

सुनीता पुढे म्हणाली, “मी देखील पार्टनर 2 बद्दल खूप ऐकले होते, पण मला काय झाले ते सविस्तर माहिती नाही. प्रेक्षकांना त्या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला नक्की आवडेल” यानंतर सुनीताला वरुण धवनबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. वरुण धवनची गोविंदासोबत तुलना केल्यावर सुनीतानेही प्रतिक्रिया दिली. सुनीता पुढे म्हणाली, लोक तुलना करतात पण त्यांनी तास नाही केला पाहिजे वरुणाला देखील त्याची तुलना होत आहे याबद्दल वाईट वाटलं असेल त्यामुळे कोणाची कोणासोबत तुलना करणे थांबावले पाहिजे.

वरुणची गोविंदाशी तुलना केल्यावर सुनीताचे उत्तर

वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी गोविंदासोबत 17-18 चित्रपट केले आहेत. तेच चित्रपट आणि काम वरुणने फार जवळून पहिले आहे असे सुनीता पुढे म्हणाली. सुनितासोबत तिच्या संपूर्ण कुटुंबाला गोविंदाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायचे आहे. गोविंदाने हल्लीच ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT