Yashvardhan Ahuja  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yashvardhan Ahuja : लेकाच्या वाढदिवसाला बाप नाही, गोविंदाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Govinda Not Seen At Yashvardhan Ahuja Birthday Party : गोविंदा लेकाच्या (यशवर्धन अहुजा) वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीला दिसला नाही. त्याच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा (Govinda ) चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. अशात नुकताच गोविंदाच्या मुलाचा वाढदिवस पार पडला. मात्र लेकाच्या बर्थडेला गोविंदाची गैरहजेरी पाहायला मिळाली. मुलाच्या बर्थडे पार्टीत गोविंदा कुठेच पाहायला मिळाला नाही.

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाचा (Yashvardhan Ahuja ) नुकताच 1 मार्चला वाढदिवस झाला आहे. यशवर्धन आता 28 वर्षांचा झाला आहे. यशवर्धन आहुजाच्या वाढदिवसाची मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यशवर्धनचा वाढदिवसाला त्याची आई आणि बहीण दोघी पाहायला मिळाल्या. मात्र गोविंदा कुठेच दिसला नाही. त्यामुळे सुनिता आहुजा आणि गोविंदा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चांना उधाण आले आहे.

गोविंदाच्या लेकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याचे कुटुंब , मित्रमंडळी सहभागी झाले होते. यशवर्धनने आई सुनिता आहुजा आणि बहीणीसोबत मिळून बर्थडेचा सुंदर केक कापला. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र लेकाच्या वाढदिवसाला गोविंदा नसल्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि पत्नी सुनीता (Sunita Ahuja) यांच्यात दुरावा आल्याचे बोले जात आहे. गोविंदाचे नाव एका ३० वर्षीय अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. यावर उत्तर देत गोविंदा म्हणाला की, "सध्या मी माझ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे."

मीडिया रिपोर्टनुसार, सुनीताने घटस्फोटांच्या चर्चांवर उत्तर देत सांगितले की, "गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्याचे नेतेमंडळी घरी यायचे. तेव्हा माझी मुलगी आणि मी शॉर्ट्समध्ये असायचो. असे त्यांच्या समोर फिरणे चांगले वाटत नाही. मी मुलांसोबत फ्लॅटमध्ये राहते आणि गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो.मला आणि गोविंदाला वेगळे करण्याची कोणात हिंमत नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

Maharashtra News Live Update: माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी

New Labour Law: तुमचा पगार वाढणार की कमी होणार? नवीन कामगार कायद्याचा कर प्रणालीवर होणार परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT