Actor Govinda Instagram @govinda_herono1
मनोरंजन बातम्या

Actor Govinda News : अभिनेता गोविंदाला गोळी लागली की मारली? मिसफायरिंगवर संशयाची सुई, पाहा व्हिडिओ

actor govinda news update : बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याने गोळी लागल्याचा दावा करण्यात येत असला तरी ही गोळी लागली की मारली? यावरून पोलिसांचा संशय बळावलाय. मात्र यामागचं कारण काय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायरिंग झाल्याने पायात गोळी घुसल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करून पायातून गोळी काढण्यात आली. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या जबाबातील माहितीमुळे पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकलीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.

गोविंदाने गोळी लागली की मारली?

गोविंदा कोलकात्याला जाण्यासाठी तयारी करत होता. रिव्हॉल्वर कपाटात ठेवताना हातातून पडली आणि मिसफायर झाल्याने गोळी पायात घुसल्याचा दावा गोविंदाने केला आहे.

गोविंदा, त्याचा मॅनेजर आणि पत्नी व मुलीने जबाब नोंदवल्यानंतरही पोलिसांच्या मनातून संशय काही जायला तयार नाही. त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात...

पोलिसांचा संशय का वाढला?

पिस्तुल साफ करताना गोळी सुटू शकते. मात्र ती वरच्या दिशेने कशी फायर झाली? रिव्हॉल्वर हातात असतानाच गोळी सुटली का? गोविंदा काहीतरी लपवत असल्याना पोलिसांना संशय आहे.

गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून 2 ते 3 दिवसात डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती गोविंदाची पत्नी सुनीता आहुजांनी दिलीय.

गोविंदाच्या मिसफायरिंगवर संशयाची सुई

गोविंदा बाहेर जाण्यापूर्वी त्याने रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या का भरल्या? त्याने पिस्तुलात सर्वच गोळ्या का टाकल्या? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे पोलिस पुन्हा गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे गोविंदाच्या जबाबातून आणि बॅलेस्टिक अहवालातून गोविंदा काही लपवतोय की काय? हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT