Bappi Lahiri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bappi Lahiri: गोल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध बप्पी लाहिरी इतकं सोनं का घालायचे, जाणून घ्या...

बप्पी लाहिरींचे नाव घेतले की त्यांची सदाबहार गाणी आठवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: रेट्रो किंग बप्पी लाहिरी यांचं वयाच्या 69 व्या वर्षी दु:खद निधन झालं आहे. बप्पी लाहिरींचे नाव घेतले की त्यांची सदाबहार गाणी आठवतात, त्यासोबतच त्यांच्या गळ्यातील आणि हातातील चमकणारे सोन्याचे दागिनेही आठवतात. बप्पी लाहिरी हे खूप सोने घालायचे. ते कुठेही गेले तरी त्यांच्या गळ्यात, हातात भरपूर सोनसाखळ्या आणि अनेक अंगठ्या असत. म्हणून त्यांना गोल्ड मॅन ऑफ इंडिया बप्पी लाहिरी या नावानेही ओळखले जाते (Gold Man Of India Bappi Lahiri wears lots of gold know why).

पण, बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) इतके सोने का घालतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुमच्यासाठी याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत.

बप्पी लाहिरी हे अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होते. त्यांना स्वतःला एल्विस प्रेस्लीशी कनेक्ट करायचे, म्हणून ते देखील एल्विससारखे बरेच दागिने घालायचे. याचा खुलासा खुद्द बप्पी लाहिरी यांनी एका मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीत बप्पी लाहिरी म्हणाले होते – "हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्ली सोन्याच्या साखळ्या घालायचे. मी प्रेस्लीचा खूप मोठा अनुयायी होतो. मला वाटायचे, जर मी एखाद्या दिवशी यशस्वी झालो तर मी स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करेन. देवाच्या कृपेमुळे मी माझी एक वेगळी प्रतिमा तयार केली. पूर्वी लोकांना वाटायचे, हा केवळ दिखावा करण्याचा मार्ग आहे, पण तसे नाही. सोने माझ्यासाठी भाग्यवान आहे".

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT