Godfather Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Godfather: 'गॉडफादर' चा बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला; आगामी दिवसात कोटीच्या कोटी उड्डाणे

चित्रपटातील चिरंजीवीच्या आणि सलमानच्या स्टाईलने प्रेक्षकांचे मने जिंकले असून चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी, बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नयनतारा आणि बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानचा चित्रपट 'गॉडफादर' बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमवत आहे. मोहन राजा दिग्दर्शित हा चित्रपट दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतातही धमाकेदार चित्रपटाचा गल्ला जमवत आहे. चित्रपटातील चिरंजीवीच्या आणि सलमानच्या स्टाईलने प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत. ट्रेड अॅनालिस्टच्या मते, 'गॉडफादर'ने अवघ्या 4 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. (Bollywood)

अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार आहे. कारण पहिल्या काही दिवसांचा चित्रपटाचा प्रतिसाद पाहता चित्रपट अजुन चांगली कमाई करु शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, चिरंजीवी आणि सलमान खानचा चित्रपट 'गॉडफादर' जागतिक स्तरावर पाचव्या दिवशी 15 ते 20 कोटींचा गल्ला जमवू शकतो. त्याच वेळी, चित्रपट भारतातील सर्व भाषांमध्ये 9 ते 10 कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा आहे. चित्रपटाची कमाई पाहता निर्मात्यांनाही आनंद झाल्याचे दिसून येत आहे.

चिरंजीवी आणि सलमान खानच्या चित्रपटाचे कलेक्शन पाहून 'गॉडफादर' 10 दिवसांत जगभरात 150 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज बांधला जात आहे. सलमान खान या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता, कारण त्याने 'गॉडफादर'साठी कोणतीही फी घेतली नव्हती. त्यामुळेच या चित्रपटाबद्दल सलमान खानची उत्सुकता द्विगुणित झाली होती.

सलमान खान आणि चिरंजीवी यांचा चित्रपट 'गॉडफादर' हा मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मल्याळम चित्रपट 'लुसिफर'चा तेलुगू रिमेक आहे. मात्र, असे असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana : 'रामायण'मध्ये तगडी स्टार कास्ट; रणबीर, साई पल्लवी ते यश, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Crime: मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

Interesting Fact: ऐकूनही विश्वास बसणार नाही! असा साप जो स्वतःवरच करतो हल्ला

Viral Video: बूट चोरण्यासाठी भर मंडपात नवरदेवाला आडवं पाडलं|VIDEO

Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT