Veena Played Pappani Ganpati Aanla Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Veena Played Pappani Ganpati Aanla: वीणा वाजवत गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ गाणं; मंत्रमुग्ध करणारे सूर एकदा ऐकाच...

Pappani Ganpati Aanla Song Viral Video: सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ या गाण्यावर एका मुलीने विणा वाजवत सादरीकरण केलं आहे.

Chetan Bodke

Veena Played Pappani Ganpati Aanla Viral Video

यंदाच्या गणेशोत्सवात ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ या गाण्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. हे गाणं आपल्याला अनेकांच्या घरी, अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये ऐकायला मिळत होतं.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी साईराज केंद्रे या मुलाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ बनवला काही क्षणात त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याला सोशल मीडियावर युजर्सकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. अशातच सध्या सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ या गाण्यावर एका मुलीने विणा वाजवत सादरीकरण केलं आहे.

गणेशोत्सवानंतर सुद्धा गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. साईराज केंद्रेनंतर एका मुलीने अनोखे एक्सप्रेशन देत विणा वाजवून गाण्याचे सादरीकरण केले. त्या मुलीने सादर केलेलं हे गाणं ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. नेटकऱ्यांना त्या मुलीने सादर केलेले गाणे फारच भावलेय. हा व्हिडीओ ‘veenasrivani_official’ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तिने दिलेल्या हावभावाची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

गाण्याविषयी सांगायचे तर, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ हे गाणं गेल्यावर्षी प्रदर्शित झालं आहे. माऊली प्रॉडक्शनकडून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन चिमुकल्यांनी हे गाणं गायलं आहे. अजूनही या गाण्याची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT