Reshma Shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Reshma Shinde : छोट्या पडद्यावरील लाडकी सून झाली बिझनेसवुमन; श्रद्धा कपूरशी आहे खास कनेक्शन

Reshma Shinde New Business : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने मोठे यश मिळवले आहे. लाडकी सून म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रेश्मा शिंदेने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

Shreya Maskar

आजकाल अनेक कलाकार हे अभिनयासोबत स्वतःचा व्यवसायही करत आहेत. त्यांनी अनेक स्वतःचे ब्रँडही मार्केटमध्ये लाँच केले आहेत. आज ऐका मराठी अभिनेत्रीने देखील स्वतः ची अशी ओळख तयार केली आहे. छोट्या पडदा गाजवणारी सर्वांची लाडाची अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) एक गुड न्यूज दिली आहे.

घरोघरी लाडकी सून म्हणून पोहचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदेने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता रेश्मा ते बिझनेसवुमन झाली आहे. 'रेश्मा रंग माझा वेगळा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकिची भूमिका साकारत आहे. या मालिकांमुळे रेश्मा खूप लोकप्रिय झाली.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या आयुष्यातील ही आनंदाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने आपल्या नव्या व्यवसायाची झलक दाखवली आहे. रेश्माने पुण्यात कोथरुड येथे ज्वेलरी शॉप उघडलं आहे. तिने पालमोनास (Palmonas ) या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून हे ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे.तिने ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगसाठी पांढर्‍या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून वेस्टर्न लूक केला होता. तिच्या या लूकवर आणि व्यवसायवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. तसेच इतर कलाकार मंडळींनी देखील तिचे कौतुक केले आहे आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धा कपूरशी खास कनेक्शन

रेश्मा शिंदेने पालमोनास ब्रँड अंतर्गत ज्वेलरी स्टोअर ओपन केलं आहे. त्या पालमोनास ब्रँडची को-फाउंडर श्रद्धा कपूर आहे. सोशल मीडियावर श्रद्धाने रेश्माच्या ज्वेलरी स्टोअरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, "पुणेकरांनो नवीन पालमोनासचं स्टोअर उघडलं आहे. या निमित्ताने पहिल्या दिवशी एकावर एक ज्वेलरी फ्री मिळणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT