Genelia SAAM TV
मनोरंजन बातम्या

Genelia : "मी ती बायको नाही जी...", रितेश देशमुखच्या Raid 2च्या ट्रेलरवर जिनिलीयाची खास प्रतिक्रिया

Genelia Reaction On Raid 2 Trailer : जिनिलीयाने 'रेड 2' चित्रपटाचा ट्रेलर पाहून हटके प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या रितेश देशमुख त्याच्या आगामी चित्रपट 'रेड 2'मुळे ( Raid 2 Trailer ) चांगलाच चर्चेत आहे. 'रेड 2'मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कालच (8 एप्रिल) ला 'रेड 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला. चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण पाहायला मिळणार आहे.

'रेड 2'च्या ट्रेलर पाहून रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) बायको जिनिलीया (Genelia ) देशमुखने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिनिलीयाने इन्स्टाग्राम ट्रेलरची स्टोरी पोस्ट केली आहे. त्या स्टोरीमध्ये जिनिलीयाने लिहिलं की, "हे मिस करता येणार नाही आणि मी वचन देते...मी ती बायको होणार नाही जी पक्षपात करते. अजय देवगण, वाणी कपूर, रितेश देशमुख आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा".

'रेड 2'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे. 'रेड 2' चित्रपटात रितेश देशमुख दादाभाईच्या भूमिकेत आहे. तर अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. अजय आणि रितेश सोबतच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड 2' चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे.

Genelia Deshmukh

'रेड 2' चा ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, दादाभाईच्या घरी अमेय पटनायक रेड मारायला येतो. आता ही रेड किती यशस्वी होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे.अमेय पटनायक त्याची 75वी रेड दादाभाईच्या घरी टाकणार आहे. 'रेड' 2018 ला प्रदर्शित झाला होता. 'रेड' चित्रपट सुपरहिट ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT