Genelia Deshmukh Pregnency Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Genelia Deshmukh Pregnency Rumours: जिनिलीया देशमुख खरंच प्रेग्नेंट आहे का?, रितेश सोबतच्या व्हिडीओमुळे होतेय चर्चा

Genelia Deshmukh And Riteish Deshmukh: जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार आहे का? या प्रश्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Genelia Deshmukh Flaunting Bloating Tummy With Riteish Deshmukh

बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक असलेल्या रितेश- जिनिलिया कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रितेश- जिनिलिया या दोघांनीही ‘वेड’ आणि ‘लय भारी’ सोबत काही बॉलिवूड चित्रपटातही एकत्र काम केलं आहे. लग्नानंतर अभिनयक्षेत्रापासून दुर गेलेल्या जिनिलियाची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते.

जिनिलिया सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांसोबत फॅमिलीसोबतच्या काही व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर रितेश- जिनिलियाचा मुंबईतल्या एका इव्हेंटमधला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओपाहून जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार आहे का? या प्रश्नाची सध्या चर्चा होत आहे.

रितेश- जिनिलिया नुकतेच मुंबईमध्ये एका फॅशनस्टोरच्या उद्घाटनासाठी एकत्र गेले होते. यावेळी दोघांनीही पापाराझींसमोर काही रोमँटिक पोज देत फोटोशूट केलं. फॅशनस्टोरच्या उद्घाटनासाठी जिनिलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस तर रितेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आकाशी रंगाची पँट परिधान केली आहे. यावेळी फोटोसाठी पोज देताना, जिनिलियाने तिच्या पोटावर हात ठेवताना दिसली. अभिनेत्रीच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा होतेय. अनेक नेटकऱ्यांनी तिसऱ्यांदा आई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाले, पुन्हा प्रेग्नेंट?, जिनिलिया गुड न्यूज देण्याच्या प्रतिक्षेत आहे. तर काहींनी रितेश- जिनिलियाला देशाच्या वाढत्या लोकसंख्येवरुन ही ट्रोल केलंय. नुकतंच रितेश- जिनिलियाचा हा व्हिडीओ विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ७४ कोटींची कमाई केली आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाची भूरळ प्रेक्षकांवर आजही कायम आहे. चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना अक्षरश: ‘वेड’ लावलं आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पहिलाच चित्रपट इतका दमदार आणि हिट ठरल्यामुळे अभिनेत्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटात रितेशसोबत पत्नी जिनिलीया देशमुख, अशोक सराफ आणि जिया शंकर प्रमुख भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT