Ritesh and Genelia Deshmukh 
मनोरंजन बातम्या

Wedding Anniversary: ​​...जेव्हा रितेश देशमुख जेनेलियाच्या 8 वेळा पाया पडला होता!

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले होते. रितेश आणि जेनेलिया आता रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ते म्हणतात ना...जोडी स्वर्गातून बनतात. काही जोडप्यांना पाहून हे खरंच आहे असे वाटते. कारण आपल्या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये देखील अशीच एक जोडी आहे, ज्याचे नाव आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा. रितेश आणि जेनेलियाची जोडी पाहता चित्रपट जगतातील सर्व रोमँटिक गाणी या दोघांवरच बनलेली आहेत असे वाटते. आज या दोघांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस आहे. (Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Wedding Anniversary)

रितेश आणि जेनेलिया लग्नाचा 10 वा वाढदिवस;

रितेश आणि जेनेलिया जवळजवळ दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर 2012 मध्ये लग्न केले. रितेश आणि जेनेलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. यानंतर हे जोडप गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांच्या सोबत आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी सर्व चाहते नेहमी उत्सुक असतात.

'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट;

रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट 2002 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. जवळपास 10 वर्षे डेटिंग केल्यानंतर रितेश आणि जेनेलिसा यांनी कायमचा एकमेकांचा हात धरला.

हे जोडपे मराठी आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते, पण तुम्हाला माहिती आहे का की लग्नात एक वेळ अशी आली जेव्हा रितेशला जेनेलियाच्या पायाला 8 वेळा पाया पडावे लागले होते? एका शो दरम्यान, जेनेलियाने तिच्या फेरी टेल लग्नाचा हा मनोरंजक किस्सा उघड केला होता.

जाणून घ्या काय आहे तो किस्सा?

जेनेलिया म्हणाली होती की, 'मला आणि रितेशला पारंपारिक विवाह आवडतात आणि मी नशीबवान आहे की माझ्या लग्नातील सर्व प्रथा मोठ्या थाटामाटात पार पडल्या. इतकेच नाही तर माझ्या विदाईच्या वेळीही मी खूप भावूक झाले होतो, अर्थातच रितेशला आठ वेळा माझ्या पाया पडावे लागले होते. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले.

काही महाराष्ट्रीयन पारंपरिक लग्नात पत्नीच्या पाय पडणे हा एक भाग आहे. यानंतर रितेश गमतीने म्हणतो की, 'मला वाटतं लग्नानंतर काय करायचं हे पंडितजींना माहीत होतं. म्हणूनच त्याने मला आधीच सराव करायला लावला होता.

लग्नानंतर जेनेलिया चित्रपटांपासून लांब;

रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश आणि जेनेलिया आता रियान आणि राहिल या दोन मुलांचे पालक आहेत. 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. या दोघांचा हा शेवटचा एकत्र चित्रपट होता. यानंतर जेनेलियाने चित्रपटांपासून ब्रेक घेतला. त्यांनतर जेनेलिया माउली या मराठी चित्रपटात रितेश सोबत होळीच्या गाण्यामध्ये डान्स करताना दिसून आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT