Genelia SAAM TV
मनोरंजन बातम्या

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Ved 2 Update : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलियाने 'वेड 2' बद्दल मोठे अपडेट दिले आहेत. ती चित्रपटाबाबत नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया (Genelia ) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. यांच्या केमिस्ट्रीचे चाहेत दिवाने आहे. यांचे चित्रपट पाहायला प्रेक्षकांना खूप आवडते. रितेश आणि जिनिलीयाया 'वेड' (Ved) चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत. 'वेड' 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'वेड' च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

नुकत्याच एका झालेल्या मुलाखतीत जिनिलीयाने 'वेड' चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत जिनिलीयाला 'वेड'च्या दुसऱ्या भागावर प्रश्न केला. त्यावर अभिनेत्री म्हणाली की,'वेड 2' नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "'वेड 2'वर सध्या काम सुरू आहे. मात्र यासाठी एक किंवा दोन वर्ष लागतील. " आता लवकरच जिनिलीया आणि रितेश ही गोड जोडी पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिनिलीयाने पुढे मुलाखतीत सांगितले की, "आमच्या मुलांना रिआन आणि राहीलला 'वेड 2' चित्रपट खूप आवडतो. "

'वेड' चित्रपट

'वेड' चित्रपटात एक सुंदर लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. चित्रपटातील श्रावणी आणि सत्याच्या जोडीने महाराष्ट्राला भुरळ घातली. या चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील भन्नाट डान्स केला आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपट

अलिकडेच जिनिलीया 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आमिर खान पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया झळकली आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेळप्रसंगी पालखीसमोर आडवे पडू; आळंदीत पालखी मुक्कामावरून वाद, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Mint Water Benefits: उन्हाळ्यात सकाळी १ ग्लास प्या पुदीन्याचे पाणी, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

Pune Tourism: महाबळेश्वरही विसराल! उकाड्यात पुण्याजवळ पिकनीकसाठी हे ऑप्शन ठरतील परफेक्ट

Mumbai Surat : प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई ते सुरत धावणार रॅपिड रेल्वे; जाणून घ्या सविस्तर माहिती

Nauvari Saree For Bride: लग्नात सप्तपदीला नेसा या सुंदर नव्या डिझाईनच्या नऊवारी साड्या, सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT