Riteish Deshmukh Rude Behaviour: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 'हाउसफुल 5' चित्रपटानंतर तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता यावेळी त्याने एका लहान मुलाच्या सेल्फीसाठी केलेली विनंती उद्धटपणे नाकारल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
घटना अशी होती की, रितेश पत्नी जेनेलिया डिसूझासोबत सितारे जमिन परच्या प्रिमियरला पोहोचला असता गर्दीतून एक लहान मुलगा त्याच्याजवळ सेल्फीसाठी येतो. मात्र रितेश त्या मुलाच्या हातातील मोबाईल हाताने बाजूला करत पुढे जातो. या प्रसंगाचा व्हिडिओ आहान शेट्टीच्या इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झपाट्याने पसरला. मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा बघून अनेक नेटकऱ्यांना वाईट वाटलं आहे.
या वागणुकीबाबत अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त करत आहे. काहींनी लिहिलं, “Housefull 5 बनाके ये अॅटिट्यूड?”, तर काहींनी म्हटलं, “एक लहान मुलगा प्रेमाने सेल्फी मागतो आणि तुम्ही त्याचं मन दुखावता?” एक युजर म्हणतो, “त्याच्या आईवडिलांनी कदाचित अभिमानाने तो क्षण टिपायला पाठवलं असेल, पण तुम्ही उद्धटपणा दाखवला.”
दुसरीकडे, काही युजर्सनी रितेशचं समर्थन करत म्हटलं की, कदाचित गर्दी आणि सुरक्षा कारणास्तव तो असं वागला असेल. मात्र, अशा प्रसंगी सेलिब्रिटींनी संयमाने आणि विनम्रपणे वागणं अपेक्षित असतं, हे देखील अनेकांनी अधोरेखित केलं. लवकरच रितेश देशमुख 'राजा शिवाजी' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेच झळकणार आहे. मात्र, या प्रकारामुळे त्याच्या प्रतिमेला थोडा धक्का बसला असून, तो यावर स्पष्टीकरण देतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.