Geheraiyaan Video You Tube
मनोरंजन बातम्या

Gehraiyaan मध्ये वापरलेलं व्हिएफएक्स पाहून चाहते झाले अवाक, निर्मात्यांनी शेअर केला खास व्हिडिओ...

‘रेड चिलीज व्हीएफएक्स’ने नुकतंच Gehraiyaan या चित्रपटातील काही सीन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Chetan Bodke

Geheraiyaan Film: गेल्या वर्षापासून बॉलिवूडसह अनेक मराठी चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात व्हिएफएक्सचा वापर केला आहे. काही चित्रपटांमध्ये व्हिएफएक्सचा वापर खूप अतिप्रमाणात केल्याने त्या चित्रपटांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. सोबतच 'पठान' मध्ये ही जबरदस्त व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला असल्याने त्याला ही ट्रोल करण्याता आले होते. यापूर्वी सर्वाधिक चर्चा 'गहराइयां' या चित्रपटाची चर्चा झाली होती.

'ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या दीपिका पादूकोणच्या ‘गहराइयां’ या चित्रपटाची चर्चा होती. नुकतेच या चित्रपटाने १ वर्ष पूर्ण केले आहे. याचे निमित्त साधत चित्रपटाच्या टीमने वर्षपूर्तीचे खास सेलिब्रेशनही केले आहे. शिवाय ‘रेड चिलीज व्हीएफएक्स’ने नुकतंच या चित्रपटातील काही सीन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटातील बहुतांश सीन्स बीचवरील आहेत. निर्मात्यांनी हे सीन्स ग्रीन स्क्रीनच्या माध्यमातून चित्रित करण्यात केले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच लोकांना ही गोष्ट कळाली. या साध्या चित्रपटातही ज्या पद्धतीचे व्हिएफएक्स वापरण्यात आले आहेत ते पाहून नक्कीच सर्वच अचंबित झाले.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना बरेच ट्रोल केले आहे. तर काहींनी निर्मात्यांनी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आणि निर्माता करण जोहरने या चित्रपटातील काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. फोटोज शेअर करत या दोघांनीही प्रेक्षकांचे आभार मानले.

विवाहबाह्य संबंधासारखा गंभीर विषय निर्मात्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून हाताळला आहे. यातील बऱ्याच बोल्ड सीन्समुळे दीपिका पादूकोण ट्रोल झाली होती. चित्रपटात दीपिका बरोबरच सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, रजत कपूर, नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT