Gautami Patil and Priya Berde
Gautami Patil and Priya Berde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil On Priya Berde: प्रिया बेर्डेंच्या टीकेवर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणाली - 'मी काय चुकते...'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे, बदलापूर

Badlapur News: महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील तरुणांच्या तोंडात सध्या सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) हेच वाक्य ऐकायला मिळत आहेत. गौतमी पाटीलच्या दमदार नृत्य आणि अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे.

एकीकडे गौतमीच्या या नृत्य शैलीला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे तिच्यावर टीकेची झोड देखील सुरु आहे. अशामध्ये मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) यांनी गौतमी पाटीलला खडेबोल सुनावले होते. आता गौतमी पाटीलने त्यांना उत्तर दिलं आहे.

बदलापूरमध्ये माजी नगरसेवक मंगेश धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार सर्वांना पाहायला मिळाला. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी बदलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या गौतमीने तिच्यावर टीका करणाऱ्या प्रिया बेर्डे यांना उत्तर दिलं. 'मी वाईट काय करतेय हे त्यांनी दाखवावं.',असं मत गौतमीने व्यक्त केलं आहे.

प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलवर सडकून टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, 'तिचे कार्यक्रम बघणारे लोक या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील.' तसंच, 'आम्ही याविरोधात आवाज उठवू, लोकांना ट्रोलिंग करू द्या, आम्ही बोलायचं थांबवणार नाही, असा इशाराही प्रिया बेर्डे यांनी दिला होता.

सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या नृत्य शैलीवरून वादंग सुरु आहे. दररोज कोण ना कोण तरी गौतमी पाटीलच्या नृत्याकडे बोट दाखवत टीका करत आहे. तिच्या नृत्यशैलीवर अनेकांनी आक्षेप घेत आहेत. सोशल मीडियावर देखील तिला ट्रोल केले जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर, किर्तनकार इंदुरीकर महाराज आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी गौतमीवर सडकून टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT