Gautami Patil Dance Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: 'एकदा कार्यक्रमाला येऊन तर बघा...'; गौतमी पाटीलने ट्रोलर्सला दिले स्पष्ट उत्तर...

सध्या सर्व महाराष्ट्राला आपल्या लावणीने वेड लावणारी गौतमी पाटील सध्या सर्वत्र कमालीची चर्चेत आहे.

Chetan Bodke

Gautami Patil: सध्या सर्व महाराष्ट्राला आपल्या लावणीने वेड लावणारी गौतमी पाटील सध्या सर्वत्र कमालीची चर्चेत आहे. सध्या तिच्या कार्यक्रमातील प्रेक्षकांची गर्दी पाहता तिचा चाहता वर्ग किती आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळते. भर कार्यक्रमात अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी तिच्या कार्यक्रमात थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. नुकतेच गौतमी पाटील यासर्व विषयावर आपले परखड मत व्यक्त करत मुलाखत दिली आहे.

मुलाखतीत गौतमी पाटील म्हणते, "पूर्वी बऱ्याच कार्यक्रमांमधून माझ्या बऱ्याच चुका झाल्या, या मी माझ्या चुका मान्य करत माफी ही मागितली आहे. तेव्हा पासून माझा पदर ही व्यवस्थित असतो. मी नेहमी कार्यक्रमात केस मोकळे सोडत नाही, तर अंबाडा बांधते. मी माझ्या कार्यक्रमात कधीच अश्लील डान्स करत नाही. त्यामुळे माझ्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात का बंदी घालण्यात येत आहे? याचे कारण मला अजूनही माहीत नाही."

सोबतच ती पुढे म्हणते, " लोकांना माझे कार्यक्रम आवडतात म्हणून येतात. माझ्या कार्यक्रमाला फक्त पुरुषच येत नाहीत तर महिलाही येतात. त्यामुळे माझे कार्यक्रम कसे होतात याची जाणीव कदाचित ट्रॉलर्सला माहीत झाले असतील. सोबतच इतके नाही तर, माझ्या कार्यक्रमात महिला माझ्या सोबत ठेकाही धरतात." गौतमीचं येत्या नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर लवकरच एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लावणीच्या नावाखाली अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील नेटकर्यांच्या चर्चेत असते. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभावासोबतच भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

SCROLL FOR NEXT