Planet Marathi: 'प्लॅनेट मराठी'कडून चाहत्यांना नवीन वर्षात खास गिफ्ट, २०२३ मध्ये प्रेक्षकांना मिळणार रिॲलिटी शोची मेजवानी...

प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन आशय- विषयाचे चित्रपट, वेबसीरिज, लघुपट, बहारदार गाणी यांसारखी मेजवानी आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आणत असतात.
Planet Marathi OTT Logo
Planet Marathi OTT LogoInstagram/ @planet.marathi
Published On

Planet Marathi: प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन आशय- विषयाचे चित्रपट, वेबसीरिज, लघुपट (Short Film), बहारदार गाणी यांसारखी मेजवानी आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आणत असतात. अल्पावधीतच प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. एका वर्षातच प्लॅनेट मराठीने खूप मोठा पल्ला पार केला.

Planet Marathi OTT Logo
Gautami Patil: 'मी लावणी करतच नाही, माझे कार्यक्रम म्हणजे फक्त...' लावणीचा अपमान होतोय म्हणणाऱ्यांची गौतमीने केली बोलती बंद

अवघ्या काही दिवसातच हा पल्ला पुर्ण केल्याने चाहत्यांकडून कौतूक केले जात आहे. २०२२ मध्ये प्लॅनेट मराठीने अनेक रेकॉर्डब्रेक चित्रपट, वेबसीरिज, गाणी, लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ६८व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘गोष्ट एका पैठणीची’ 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा मानकरी ठरला तर ‘सुमी’ने सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' या पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

Planet Marathi OTT Logo
TMKOC: अय्यरने रियल लाईफमध्ये बांधली लगीनगाठ, ४२ व्या वर्षात मिळाली बबीतापेक्षा देखणी बायको...

२०२२ यावर्षात सुपरहिट ठरलेला ‘चंद्रमुखी’, ‘तमाशा लाईव्ह’, ‘सहेला रे’ सारखे दर्जेदार चित्रपट असो किंवा ‘अनुराधा’, ‘मी पुन्हा येईन’, ‘रानबाजार’, ‘अथांग’ यांसारख्या सर्वाधिक प्रेक्षकांकडून पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज आहेत. या सर्वच कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकांनी यासर्व चित्रपटांना आणि वेबसीरिजना मनभरुन प्रेम दिले आहेत.

२०२२ प्रमाणेच प्लॅनेट मराठी आता २०२३ मध्येही प्रेक्षकांसाठी अनेक वेब शो, चित्रपट, लघुपट आणि काही खास सरप्राईज घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. नवीन वर्षातही प्लॅनेट मराठी मनोरंजनाचा धमाका घेऊन येणार आहेत.

Planet Marathi OTT Logo
Gautami Patil: 'पोलिस संरक्षण न दिल्यास आम्ही देऊ'; गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ 'या' संघटनेने छेडले आंदोलन

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "२०२२ हे वर्ष आमच्यासाठी खूप छान गेले. यावर्षी अनेक पुरस्कार, अनेक उद्दिष्टये साध्य करता आली. चांगला आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. खरंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हाच आमच्यासाठी मौल्यवान आहे."

Planet Marathi OTT Logo
Siddharth: टॉलिवूड अभिनेता सिद्धार्थचा विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आरोप, म्हणाला 'माझ्या पालकांना'...

सोबतच प्लॅनेट मराठीचे प्रमुख पुढे म्हणतात, "२०२३ मध्ये अनेक चित्रपट, वेबसीरिज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. सोबतच यावेळी रिॲलिटी शोवर जास्त भर देण्याचा प्रयत्न असेल. यामुळे नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळेल. २०२२ मध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या, आता आम्ही पुन्हा नवीन वर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालो आहोत आणि २०२३ त्याहूनही धमाका असणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com