Gautami Patil News Saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil on Prajakta Mali : प्राजक्ताला मिळाली गौतमी पाटीलची साथ; कलाकारांच्या बदनामीवर दिलं परखड उत्तर

Gautami Patil News : पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीने खंत व्यक्त केली. तसेच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. प्राजक्ता माळीच्या भूमिकेला आता गौतमी पाटीलचा पाठिंबा मिळाला आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : बीडमधील प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसहित इतर दोन अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख केला होता. सुरेश धस यांनी नावाचा उल्लेख केल्याने प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन तीव्र संताप व्यक्त केला. सुरेश धस यांच्यासारखे राजकारणी महिलांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवत आहेत, अशा शब्दात प्राजक्ता माळीने भावना व्यक्त केल्या. आता या संपूर्ण प्रकारानंतर नृत्यांगणा गौतमी पाटील देखील प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावली आहे. 'कलाकाराचं नाव कुणासोबत जोडू नका, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं आहे.

आमदार सुरेश धस यांनी बीडच्या इव्हेंट मॅनेजमेंटवर भाष्य करताना काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यात प्राजक्ता माळीच्या नावाचाही समावेश होता. सुरेश धस यांनी प्राजक्ताच्या नावाचा उल्लेख केल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. या ट्रोलिंगला कंटाळल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळीने मनातील खंत व्यक्त केली.

आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत केली. प्राजक्ता माळीने भावना व्यक्त केल्यानंतर नृत्यांगणा गौतमी पाटीलने तिच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. बदलापुरात आगरी महोत्सवाला प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने हजेरी लावली. यावेळी गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीच्या वक्तव्यावर भाष्य केलं. कलाकारांची बदनामी करणे चुकीचं असल्याचं तिनं म्हटलं.

गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

गौतमी पाटील म्हणाली, कलाकार हा कलाकार असतो. त्याचं कोणासोबत नाव जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य आहे. तिच्या भूमिकेचं समर्थन करते. आपल्यालाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं. मात्र मी खचून गेले नाही. त्यामुळे प्राजक्तानेही खंबीरपणे उभे राहून आपली कला सादर करत राहावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT