Gautami Patil saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil : "गच्चीवर झाली आमची पहिली भेट..."; गौतमी पाटीलनं 'त्या' खास व्यक्तीसाठी घेतला उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

Gautami Patil Ukhane Video : लावणी क्वीन गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती खास उखाणा घेत आहे. ज्यामुळे गौतमीचे लग्न ठरल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

नृत्यांगणा गौतमी पाटीलने 'त्या' खास व्यक्तीसाठी उखाणा घेतला आहे.

गौतमी पाटीलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

गौतमी पाटील लावणी क्वीन म्हणून ओळखली जाते.

सबसे कातिल गौतमी पाटील पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. तसा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती गौतमी लग्न करताना, नवऱ्यासाठी उखाणा घेताना दिसत आहे. गौतमी पाटीलने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेता ओंकार राऊतसोबत लग्न केल्याचे बोले जात आहे. मात्र हे सर्व खरं नसून गौतमी पाटील आणि ओंकार राऊतचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्यात एक क्यूट लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी पाटील आणि ओंकार राऊत वधू-वराच्या रुपात पाहायला मिळत आहे. दोघांच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आहेत. दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. गौतमीच्या हातात हिरवा चुडा दिसत आहे. व्हिडीओत ती लाजत लाजत ओंकारचे उखाण्यात नाव घेताना दिसत आहे. आजूबाजूला पाहुण्यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. व्हिडीओत गौतमी-ओंकारच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गौतमी पाटीलचा उखाणा

"ना वायफाय, ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट; ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट..."

गौतमी-ओंकारचे नवीन गाणे

गौतमी पाटील आणि ओंकार राऊतच्या नवीन गाण्याचे नाव 'गच्ची' असे आहे. हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मिडियावर गाण्याच्या अनेक रील व्हायरल होत आहेत. नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. सुरूवातीला चाहत्यांना खरंच गौतमीचे लग्न झाल्याचे वाटले.

वर्कफ्रंट

गौतमी पाटील अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. गौतमी पाटील अलिकडेच 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच तिच्या 'देवमाणूस' मधील एन्ट्रीने तर चाहते खूपच खुश झाले होते. अलिकडेच गौतमी पाटीलची 'सुंदरा', 'बैलगाड्याचा नाद', 'रुपेरी वाळूत' अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4 हजार रूपये? केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2 हजार देणार?

Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंचा भूतानमध्ये कहर; दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये जिंकली सुवर्णपदकं

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

Eng vs Pak Highlights : इंग्लंडनं पाकिस्तानला दिला ८ वर्षांनंतर जबरा झटका; एक डाव आणि १०३ धावांनी उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT