Gautami Patil And Indurikar Maharaj Controversy Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami- Indurikar Maharaj Trolling: 'गौतमी पाटीलनं लावणीची संस्कृती बिघडवली, इंदुरीकर महाराजांनाही लोक नावं ठेवतात'

Gautami Patil and Indurikar Maharaj: ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Pooja Dange

Gautami Patil and Indurikar Maharaj Need Self Analysation: डान्सर गौतमी पाटील तिची दररोज चर्चा होते. गौतमीवर अनेकजण टीका करतात आणि नवीन वाद निर्माण होतो. ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकांमुळे गौतमीमुळे निर्माण झालेले वाद आणखीनच रंगले.

गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले होते. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांची ढोपरं फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.

इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेला गौतमी पाटील उत्तर दिले होते. या प्रकरणानंतर इंदुरीकर महाराजांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड टीका करण्यात आली होती. आता गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला जेष्ठ साहित्यिकांनी दिला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. दोघांनाही त्यांच्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात, असं सदानंद मोरे यांनी म्हंटलं आहे. यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खोचक टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात किर्तनाला मिळणारे पैसे आणि लावणीसाठी मिळणारे पैसे यावरून वाद निर्माण झाला होता. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो, असे इंदूरीकर महाराज म्हणाले होते.

तर इंदुरीकर महाराजांना उत्तर देत गौतमी पाटीलने म्हटले होते की, मी काय बोलणार त्यांच्याविषयी. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजन का केलं असतं.

आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT