Maharashtrachi HasyaJatra Actors In Boyz 4  Instagram @im_gaurav_more20
मनोरंजन बातम्या

Gaurav More Post: गौऱ्या आणि बनेची दोस्ती जगात भारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांची 'बॉइज 4'मध्ये एन्ट्री

Boyz 4 Cast: 'बॉईज ४'मध्ये गौरव मोरे आणि निखिल बने दिसणार आहेत.

Pooja Dange

Maharashtrachi Hasyajatra Fame Nikhil Bane Movie Debut:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' दोन महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या दोन महिन्यात या मालिकेतील कलाकरांनी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुफान काम केलं आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकरने सुबोध भावेसह चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. तर आता मालिकेतील इतर कलाकार चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा जीव असलेला हास्यवीर गौरव मोरे चित्रपटात दिसणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे. गौरव मोरे अंकुश, लंडन मिसळसह एका बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे. गौरव मोरेसह हास्यजत्रेतील आणखी एक कलाकार चित्रपटामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

गौरव मोरेने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हास्यजत्रेतील निखिल बने दिसत आहे. गौरव मोरेने शेअर केलेली ही पोस्ट 'बॉईज ४' चित्रपटाची आहे. गौरवने ही पोस्ट शेअर केलात म्हटलं आहे की, 'बने, आपण आहोत रे Boyz4 मध्ये! ही दोस्ती तुटायची नाय!'

गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी केमेन्ट केली आहे. 'Woooooo! आज तो आईसा दिन बने !! निखिल बने' अशी कमेंट सई ताम्हणकरने केली आहे. 'ये बने..ये हुई न बात....खूप खूप मस्त वाटलं भावा' अशी कमेंट करत समीर चौघुलेने निखिल बनेचं अभिनंदन केलं आहे. वनिता खरात, पार्थ भालेराव, प्रियदर्शनी इंदुलकर यांनी देखील गौरवच्या पोस्टवर कमेंट करत निखिल बनेला शुभेच्छा दिल्या आहेत. (Celebrity)

'बॉईज ४'मध्ये गौरव मोरे आणि निखिल बने दिसणार आहेत. हा चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. २०१७ साली आलेल्या 'बॉईज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि रितिका श्रोत्री यांनी मुख्य भूमिका साकारल होती.

२०१८ साली 'बॉईज २' आणि २०२२ साली 'बॉईज ३' हे चित्रपट प्रदर्शित झाले. 'बॉईज'च्या या फ्रेंचायजीला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे आता या फ्रेंचायजीचा ४था चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉईज ४' मध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार दिसणार आहेत. यामुळे या चित्रपटामध्ये आणखी धमाल पाहायला मिळणार हे नक्की. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT