अभिनेते रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीला नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. रविंद्र महाजनींचे निधन १५ जुलै रोजी झाले असून निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी कळाली. रविंद्र यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला. रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अनेकांनी गश्मीरवर नाराजी व्यक्त केली होती. गश्मीरने हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं म्हणत त्याने मौन बाळगले. पण आता अभिनेत्याने ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केलंय.
वडील वेगळे का राहायचे याबद्दल गश्मीर म्हणाला, “मी माझ्या वडीलांना एका छोट्या घरात सोडून मी आरामदायक आयुष्य जगतोय, असं अनेकांना वाटायचं, पण असं काहीही नव्हतं. त्यांनी स्वतःच २० वर्षांपूर्वी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकत नव्हतो. त्यांनी कुटुंबासोबत राहावं अशी जबरदस्ती आम्ही कधीच त्यांच्याकडे केली नाही. जर त्यांना आम्हाला कधी भेटायचं असेल तर, ते आमच्याकडे राहायला ही यायचे. मुडी स्वभाव असलेल्या बाबांना एकांत खूप आवडायचा. त्यांना एकटेपणा खूपच आवडायचा, त्यांना कोणी केलेली मदत नव्हती आवडत.”
गश्मीर पुढे मुलाखतीत म्हणाला, “ज्यावेळी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळी ते अनेक दिवस आमच्यासोबत राहिले होते. बाबांचा आधीपासूनच मुडी स्वभाव होता, त्यांना कायमच स्वत:ची कामं स्वत: करायला आवडायचे. ज्यावेळी आम्ही त्यांच्यासाठी केअर टेकर द्यायचो तेव्हा ते एक-दोन दिवसांत त्याला कामावरुन काढून टाकायचे. अनेकदा आपल्याला समाजात वडील आणि मुलांच्या नात्यामध्ये गुंतागुंत आणि दुरावा दिसून येतो.”
गश्मीर पुढे म्हणाला, “वडील एका ठराविक वयानंतर मुलाचे मित्र होऊ शकत नाही. त्यांच्यात वडील आणि मुलगा हेच नातं कायम राहतं. पण त्यामुळे नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण होतो. वडील आणि मुलगा एकमेकांना समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात. नात्यमध्ये दुरावा आल्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर या गोष्टी कमी होतात. वडील झाल्यानंतरच प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव येतो. त्यांनी काही वर्षापासून सर्वांसोबतच स्वतःला दुर केलं होतं. अनेक कारणांमुळे आमच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. अनेक वैयक्तिक सखोल कौटुंबिक रहस्यं आम्ही सार्वजनिकपणे उघड करु शकत नाहीत.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.