Priyadarshini Indalkar New Car: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनीची ‘स्वप्नपुर्ती’, स्वकमाईने खरेदी केली महागडी कार

Priyadarshini Indalkar News: प्रियदर्शनीने सोशल मीडियावर आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
Priyadarshini Indalkar Buy New Car
Priyadarshini Indalkar Buy New CarInstagram
Published On

Priyadarshini Indalkar Buy New Car

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाप्रमाणेच शोमधील कलाकार देखील कायमच चर्चेत असतात. शोमधील कलाकारांचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. कायमच आपल्या विनोेदामुळे चर्चेत राहणारी प्रियदर्शनी इंदलकर सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्री आपल्या विनोदामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. प्रियदर्शनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गुड न्यूज दिली आहे. नुकतंच प्रियदर्शनीचा वाढदिवस झाला असून तिने आपल्या वाढदिवसानिमित्त नवीन कार खरेदी केली आहे.

Priyadarshini Indalkar Buy New Car
Smita Deo Post: सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट; म्हणाली, “आमच्यातील नातं…”

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा २३ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला तिने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. अभिनेत्रीने कार घेतल्यामुळे सोशल मीडियावर ती तुफान चर्चेत आली आहे. सध्या तिचे चाहते तिचं पोस्टच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.

Priyadarshini Indalkar Buy New Car
Preity Zinta Share Emotional Note: प्रीती झिंटाच्या सासऱ्यांचं निधन; अभिनेत्रीने भावुक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली, “२३ ऑगस्ट २०२३, माझ्या कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे आगमन, वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत”… त्या सर्वांना ‘Thank you’! आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन ! PS - या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7… IS THE WINNER !”

अभिनेत्रीने नवीन अलिशान कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केल्याचे फोटो शेअर करताच, अनेक सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, शिवाली परब, ओंकार राऊत, गौरी नलावडे, पृथ्विक प्रताप सह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

प्रियदर्शनीबद्दल बोलायचं तर, तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच विशेष ओळख मिळाली आहे. तिने स्वतःचं प्रेमळ स्थान निर्माण करत चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयामुळे ती कायमच चर्चेत असते. हास्यजत्रेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके असून प्रियदर्शनी इंदलकर देखील चाहत्यांची लाडकी आहे. हास्यजत्रेत तिने विविध पात्रं साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियदर्शनीने स्वतःच्या मेहनतीवर नवीन कार विकत घेतल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com