Santosh Juvekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar : 'Detox झालंय एकदम...' म्हणत संतोष जुवेकरनं शेअर केला कोकणातील सुट्टीचा आनंद

Santosh Juvekar Vacation : संतोष जुवेकरनं कोकणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Santosh Juvekar Shared Video

संतोष जुवेकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो. नुकताच त्याने कोकणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अनेक सेलिब्रिटीही गणेशोत्सव आणि फिरण्यासाठी बाहेर गेले आहेत. अशातच अभिनेता संतोष जुवेकरने गावी म्हणजेच कोकणात सुट्ट्यांचा मनोसोक्त आनंद लुटला आहे. संतोष नेहमीच सोशल मीडियावरुन अपडेट शेअर करत असतो. यावेळी त्याने कोकणातील मस्ती, मज्जा आणि खाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची नाळ ही त्याच्या गावाशी जोडलेली असते. तो कधी न कधी आपल्या गावी जातोच. तेथील सर्व गोष्टींचा आनंद घेतो. हाच आनंद अभिनेता संतोष जुवेकरने घेतला आहे.

व्हिडिओत संतोष जुवेकर मनमोकळेपणाने कोकणात आनंद घेताना दिसत आहे. संतोषने पावसात भिजण्याचा,नदीत पोहण्याचा पुरेपुर आनंद लुटला आहे. संतोष नदीत उडी घेऊन पोहताना दिसत आहे. त्यानंतर त्याने चुलीवरचं जेवण, माश्याच सार आणि भातावर ताव मारल्याचं दिसत आहे.

'कोकण माझं गाव माझं. खूप काही चोकप झालं होत. माझ्या गावचा माझ्या कोकणाचा दट्ट्या दिला. आणि सगळं एकदम मोकळ मोकळ झालं,आता नव्याने भरभरून वहायला मी मोकळा झालो. पावसात भिजलो, रानात हिंडलो, नदीत पोहोलो आणि चुलीवरचा भात आणि माश्याच सार आणि तुकडी असं अस्सल meditation करून आलो. आता मन आणि शरीर दोनीही Detox झालंय एकदम' असं हटके कॅप्शन दिलं आहे.

संतोषच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. संतोषचा हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी गावाला जायची इच्छा व्यक्त केली आहे. संतोष जुवेकर आणि सोनाली कुलकर्णीचा 'डेट भेट' हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT