बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज सकाळी केलेल्या एका पोस्टने सर्वांना विचारात पाडले होते. या पोस्टमध्ये सलमान खानने 'एफ' नावाचा नवीन शब्द शिकल्याचे सांगितले होते. आता सलमान खानने या शब्दाचा अर्थ सांगत त्याने निर्मिती केलेल्या 'फर्रे' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानची भाची अलिझेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सलमान खानने आज सकाळी केलेल्या इन्सा पोस्टमध्ये फक्त 'Farrey' असं लिहिलं होते. तसंच त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'सकाळी सकाळी एक नवीन 'एफ' शब्द शिकलो. ४ वाजता सांगेल.', असं लिहिलं होतं. या रहस्यमय पोस्टरमुळे अनेकांना प्रश्न पडला होता की या एफचा अर्थ काय आहे. आता सलमान खानने नवीन पोस्ट शेअर करत या एफचा अर्थ सांगितला आहे. त्याने बरोबर ४ वाजता इन्स्टाग्रामवर 'फरे' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाची निर्मीती सलमान खानने केली आहे.
सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री लवकरच अभिनेत्याच्या 'फर्रे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा चर्चा सुरू होत्या. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. पण आता सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. आज सलमान खानने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये अलिझेहची झलकही पाहायला मिळत आहे.
सलमान खानने इन्स्टावर चित्रपटाचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'मी या एफ शब्दाबद्दल बोलत होतो. तुम्हाला काय वाटले! #FarrayTeaser आता आऊट..' सलमान खानचा 'फर्रे' हा थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची भाची अलिझेह देखील दिसत आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा शाळकरी मुलांवर आधारीत आहे जी टीझर पाहून समजून येत आहे.
ट्रेलरमध्ये अलिझेह खूपच घाबरलेली दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. जो सलमान खानच्या चाहत्यांनाही खूप आवडला. फर्रे हा अलीझेहचा पहिला चित्रपट आहे जो सलमान खान फिल्म्स निर्मित करत आहे. फर्रेचा टीझर पाहून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. हा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. फर्रेचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले असून यात अलिझेह, झेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.