Gadar 2 13th Day Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'चा धुराळा; 13 दिवसात 500 कोटींचं कलेक्शन

Gadar 2 Box Office Collection: गदर २ जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Pooja Dange

Gadar 2 Worldwide Collection:

सनी देओल आणि आमिष पटेल यांच्या 'गदर २'ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. गदर २ मधील तारा सिंग आणि साकीना प्रेक्षकांचे मने जिंकत असून कोट्यवधींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन समोर आले आहे.

गदर २ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले. चित्रपटाने ३ दिवसात ३०० कोटींचा पल्ला पार केला. तर दुसऱ्या वीकेंडला सर्वाधिक कलेक्शन करून पठान, बाहुबली सारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार गदर २ जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने ५२५.१४ कोटींची कमाई केली आहे. लवकरच गदर २ जगभरातील कलेक्शन ६०० कोटी होऊ शकते.

गदर २ चित्रपटाला प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत. १३ दिवसात चित्रपटाने भारतात ४११.१० करोडचे कलेक्शन केले आहे. तर गदर २ टार्गेट ५०० करोड आहे जे या वीकेंडला पूर्ण होऊ शकते. भारतात चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे.

गदर २ ने काल म्हणजे २३ ऑगस्टला फक्त १० कोटींची कमाई केली आहे. ही या चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात कमी कमाई असणार आहे. (Latest Entertainment News)

'गदर २'च्या निर्मात्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, " 'गदर २' हा चित्रपट ओटीटीवर आणखी दोन महिन्यांनी प्रदर्शित होणार आहे. अद्याप ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर झालेली नाही. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'झी 5' (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. थिएटरप्रमाणेच ओटीटीवरसुद्धा सनी देओल आणि अमिशा पटेल यांचा हा चित्रपट चांगलाच धमाका करेल."

गदर २ बद्दल

गदर 2 हा 2001 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या गदर: एक प्रेम कथा या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. 2001 च्या चित्रपटात सनीने तारा सिंग या ट्रक ड्रायव्हरची भूमिका केली होती, तर अमीषा पटेलने सकीनाची भूमिका केली होती . हा चित्रपट 1947 मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीवर आधारित होता.

गदर 2 देखील तारा सिंगवर आधारित आहे. कारण तारा सिंग मुलाला वाचवण्याच्या सीमेपलीकडे जातो. उत्कर्ष शर्माने पाकिस्तानमध्ये पकडला गेला आहे.त्याला वाचविण्यासाठी तो धाडसी पाऊल उचलतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Jobs: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; २५३ पदांसाठी भरती

Assembly Election 2024 : लातूरच्या टेंभुर्णी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी घेतला निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: बुलढाण्यात मतदान यंत्रात बिघाड, मतदान थांबले

Maharashtra Voting Update : गडचिरोलीकर आघाडीवर, मुंबईत फक्त १५ टक्के मतदान, राज्यात ११ वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?

Mangal Vakri: जानेवारी महिन्यात मंगळ ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींना गुंतवणूकीतून मिळणार दुप्पट लाभ

SCROLL FOR NEXT