Gadar 2 Created History Saam TV
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Breaks Record: 'गदर 2'ने रचला इतिहास: बक्कळ कमाई केलेल्या 5 सिनेमांचे रेकॉर्ड मोडला

Gadar 2 Box Office Collection: गदर २'ने इतिहास रचला, नवीन विक्रम प्रस्तापित केला आहे.

Pooja Dange

Gadar 2 Box Office Collection Day 10:

सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन फक्त १० दिवस झाले आहेत. एवढ्या दहा दिवसात चित्रपटाने मोठा पल्ला गाठला आहे.

सनी देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस मोठी कमाई केली आहे. तर त्याच्या १० दिवसाचे कलेक्शन रेकॉर्ड ब्रेकिंग ठरलं आहे. बक्कळ कमाई केलेल्या टॉप ५ चित्रपटांचा रेकॉर्ड गदर २ने मोडला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत 'गदर २'च्या यशाविषयी माहिती दिली आहे. तरण आदर्श लिहिले आहे की, 'गदर २'ने इतिहास रचला, नवीन विक्रम प्रस्तापित केला... 'गदर २' २ आठवड्याच्या वीकेंडला (शुक्रवार ते रविवार) सर्वाधिक कमाई करणार हिंदी चित्रपट ठरला आहे. 'गदर २'ने खूप मोठ्या फरकाने हा विक्रम केला आहे.

गदर २: ९०.४७ कोटी तर

पठान: ६३.५० कोटी

बाहुबली २: ८०:७५ कोटी

केजीएफ २: ५२.४९ कोटी

दंगल: ७३.७० कोटी

संजू: ६२.९७ कोटी' (Latest Entertainment News)

तरण आदर्श यांनी आणखी एक ट्विट करत याचे विश्लेषण देखील केले आहे. 'Gadar2 वीकेंड 2 मध्ये इतिहास रचतो… होय, हा हिंदी सिनेमाचा सर्वात मोठा वीकेंड 2 आहे… हा एक नवीन बेंचमार्क आहे… ऑल टाइम ब्लॉकबस्टर… [आठवडा 2] शुक्रवार, 20.50 कोटी cr, सन 38.90 कोटी. एकूण: ₹ 375.10 कोटी.'

काय म्हणाले तरण आदर्श?

तरण आदर्श यांनी म्हटले आहे की, हा वीकेंड हिंदी सिनेमासाठी खूप मोठा होता. 'गदर २'ने एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. पठान, बाहुबली २, केजीएफ २, दंगल, संजू या चित्रपटना मागे टाकत 'गदर २'ने हा रेकॉर्ड बनविला आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी चित्रपटाने एकूण ९०.४७ कोटींची कमाई केली आहे.

सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. तांत्रिक कारणांमुळे बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT