Fukrey 3, Chandramukhi 2 And The Vaccine War 4th Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fukrey 3 And Chandramukhi 2 4th Day Collection: ‘फुक्रे ३’च्या कमाईचा आलेख चढताच, ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

Chetan Bodke

Fukrey 3, Chandramukhi 2 And The Vaccine War 4th Day Box Office Collection

नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘फुक्रे ३’ (Fukrey 3), ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War), ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) ची बॉक्स ऑफिसवर प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फुक्रे ३’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’ला प्रेक्षकांकडून या दोन्हीही चित्रपटांना विशेष प्रतिसाद मिळत नाही.

‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’ला पहिल्या दिवसापासून खूप कमी प्रतिसाद मिळत आहे, पण ‘फुक्रे ३’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. एक नजर टाकूया, या तिनही चित्रपटांना पहिल्या विकेंडला कसा प्रतिसाद मिळाला आहे.

‘फुक्रे’ आणि ‘फुक्रे रिटर्न्स’च्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘फुक्रे ३’ चित्रपट आला आहे. घोषणा झाल्यापासून चर्चेत राहिलेल्या, या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडला अर्थात प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, फुक्रे ३ने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी १५. २५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसात एकूण ४३.५५ कोटींचा टप्पा गाठला आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ने चौथ्या दिवशी फारच कमी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने ओपनिंग फार मोठी केली नाही. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी २.२० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने चार दिवसात जेमतेम ५. ७० कोटींचा टप्पा गाठला आहे.

‘चंद्रमुखी २’बद्दल सांगायचे तर, चित्रपटाने पहिल्या दिवसाची सुरुवात दिलासादायक कमाईने केलेली होती. पण नंतर या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस कमी होत गेला. सॅकल्निच्या अहवालानुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत या चित्रपटाने २४ कोटींच्या आसपास कमाईचा आकडा गाठलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT