Avirat Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

Avirat Patil : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'फ्लावरिंग मॅन' या लघुपटाला नॉन फिचर फिल्म कॅटेगिरी मध्ये सुवर्णकमळ मिळाले आहे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने (FTII) या लघुपटाची निर्मिती केली आहे.

Shruti Vilas Kadam

गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई

Avirat Patil: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'फ्लावरिंग मॅन' या लघुपटाला नॉन फिचर फिल्म कॅटेगिरी मध्ये सुवर्णकमळ मिळाले आहे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने (FTII) या लघुपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे जळगावच्या अविरत पाटील या तरुणाने या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी म्हणजेच छायाचित्रण केलं आहे. एफटीआयआयमध्ये 2022 साली शिकत असताना अविरत पाटीलसह त्याचे सहकारी सौम्यजीत घोष, मणिकंदन, अनुराग पंत या चार विद्यार्थ्यांनी मिळून हा 25 मिनिटांचा लघुपट बनवला. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी होती. देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सिनेमाच्या टिमचे कौतुक होत आहे. सिनेमात वडील आणि मुलीची भावस्पर्शी कथा आहे.

दिल्ली येथील विज्ञान भवनात दिनांक 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आले. अभिनेता शाहरुख खान, विक्रांत मेसी, अभिनेत्री राणी मुखर्जी, दिग्दर्शक करण जोहर यांच्यासोबतच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल अशा दिग्गजांना यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. एफटीआयआयचे संचालक धीरज सिंग यांनी हा मानाचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. यावेळी अविरत पाटीलसह सिनेमा बनविणारे चौघेही जण विज्ञान भवनात उपस्थित होते.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना शेवटच्या तिसऱ्या वर्षी एक फिल्म बनवावी लागते. अविरत पाटीलची पण ही पहिलीच फिल्म आहे. त्याच्या पहिल्याच सिनेमाला प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानं जळगावच्या कला क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.

Avirat Patil

लहानपणीच दिसली आई-वडीलांना चुणूक

जळगावच्या नाट्य क्षेत्रातील आघाडीची संस्था 'परिवर्तन'चे ज्येष्ठ कलावंत शंभू पाटील आणि सोनाली पाटील यांचा अविरत पाटील मुलगा आहे. जळगाव मधील आर. आर. शाळा येथे त्याचं शालेय शिक्षण झालं आहे. एम. जे. कॉलेज येथे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने जळगावच्या बांभोरी येथील इंजिनियरिंग कॉलेज इथून स्थापत्य (सिव्हिल) शाखेची पदवी मिळवली. त्यानंतर मात्र त्याने आवडीच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट येथे प्रवेश घेतला. सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले. खरंतर अविरतचा लहानपणापासूनच कलेकडे ओढा होता. तो वेगवेगळी चित्र काढत होता. सातवीत असतानाच त्याने मोबाईलमध्ये घराजवळ उभ्या असलेल्या गाय आणि मांजराची छान शॉर्ट फिल्म बनवली होती. जणूकाय गाय आणि मांजरामध्ये संवाद सुरु आहे. तेव्हाच अविरतकडे काहीतरी वेगळ करण्याची क्षमता आहे, तो क्रिएटिव्ह असल्याचं लक्षात आलं, अशी आठवण सोनाली पाटील यांनी अविरतच्या फिल्मला पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितली. मुलांना पंख पसरु द्यावे, त्यांनी भरारी घ्यावी, अशी प्रतिक्रीया अविरतच्या यशानंतर वडील शंभू पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली.

सिनेमॅटोग्राफी मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अविरत पाटील हा खानदेशसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे कलाक्षेत्रात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील जळगावच्या नाट्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत. परीवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्य क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. काही अनोखे प्रयोग केले आहेत. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, खान्देश एज्युकेशन सोसायटीचे नंदकुमार बेंडाळे आणि जळगावच्या कला, सांस्कृतिक क्षेत्रातून अविरत पाटिलचे कौतुक होत आहे. भविष्यात त्यानं आणखी प्रभावी काम करावे, उंच झेप घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT