Sohail Khan and Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan: सोहेलची भाईगिरी, सलमानच्या नावाचा दरारा; सर्वच आलं अभिनेत्याच्या अंगलट...

सोहेल खानची वांद्रा आणि परिसरात खुपच गुंडगिरी चालायची, या दरम्यान तो आपल्या मर्यादाही विसरला होता.

Chetan Bodke

Sohail Khan: हिंदी चित्रपटसृष्टीत खान कुटुंबीय नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त कृत्यांमुळे. ज्येष्ठ लेखक सलीम खान यांचे तीनही मुलं सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान सध्या बॉलिवूड इंडस्ट्रित कार्यरत आहेत. हे तीघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सलमानचे अद्याप लग्न झालेले नाही, अरबाज खाननंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोहेल खाननेही पत्नीकडून घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सोहेल खानची वांद्रा आणि परिसरात खुपच गुंडगिरी चालायची, या दरम्यान तो आपल्या मर्यादाही विसरला होता. सलमान खानचा लहान भाऊ असल्याचा त्याला अभिमान होता, त्याचा गैरफायदा घेण्याचा त्याने अनेकदा प्रयत्नही केला होता.

एकदा सलमान खानने स्वत: सोहेलच्या अंगातील गुर्मी चांगलीच बाहेर काढली. एकदा सोहेल खान वांद्रे परिसरात एका पबमध्ये पार्टी करत होता. पार्टीत सोहेल खान पूर्णपणे दारुच्या नशेत होता. पबमधून बाहेर आल्यावर दारुच्या नशेत असल्याने तो बेभान गाडी चालवत होता.

दारुच्या नशेत असताना तो गाडी कशी चालवत आहे, याचं सुद्धा त्याला भान नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या वाहनांनाही त्याचा खुप त्रास होत होता. अनेकदा दुसऱ्या गाड्यांनीही सोहेलला हॉर्न दिला. पण तो दारुच्या नशेत असल्याने काहीच कळत नव्हते.

सोहेल खानने मागून येणाऱ्या वाहनाला साईड दिली नसल्याने दुसऱ्या वाहनाने त्याला ओव्हरटेक करत पुढे निघून गेला. यामुळे सोहेल त्याच्यावर कमालीचा संतापला. रागाच्या भरात त्याने भररस्त्यावर त्या गाडीला धडक दिली.

त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी होत तो वाद हाणामारी पर्यंत पोहोचल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला होता. सलमान खानला या घटनेची माहिती मिळताच तो घटनास्थळी पोहोचला, मात्र तोपर्यंत सोहेल खानला मारहाण करून दुसरा ड्रायव्हर निघुन गेला होता.

दरम्यान, सलमान खानला सर्व घटना समजल्यानंतर, ज्यांनी सोहेलला मारहाण केली तो कोणत्या तरी आमदाराचा मुलगा होता आणि सर्व त्याचे मित्र गुंड प्रवृत्तीचे होते. सलमानने सोहेलला आहे त्याच अवस्थेत आमदारांच्या घरी जाऊन तेथे सर्वांची माफी मागायला सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT