
Tom Cruise Celebration: हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला टॉम क्रूझ अमेरिकन चित्रपट उद्योगातील खूप मोठे नाव आहे. टॉम क्रूझ त्याच्या चित्रपटांमध्ये अनेक भयंकर स्टंट करत असतो. चित्रपटांव्यतिरिक्त, तो कधीकधी त्याच्या खऱ्या जीवनात देखील असे लोकांना चकित करणारे धोकादायक स्टंट करताना दिसतो.
अलिकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये टॉम क्रूझने 'टॉप गन: मॅव्हरिक' चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे चाहत्यांचे आभार मनात आहे. हेलिकॉप्टरमधून उडी मारून तो 'टॉप गन: मॅव्हरिक'ला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या या पराक्रमावर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Hollywood)
जोसेफ कोसिंस्की दिग्दर्शित, 'टॉप गन: मॅव्हरिक' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पॅरामाउंट पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 1986 मध्ये आलेल्या 'टॉप गन' चित्रपटाचा रिमेक होता. हा पॅरामाउंट पिक्चर्सचा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आतापर्यंत हा विक्रम 'टायटॅनिक' या चित्रपटाचा होता. यासह हा चित्रपट टॉम क्रूझच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. (Movie)
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांपैकी टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅव्हरिक'ने सर्वाधिक कमाई केली. त्यामुळे अभिनेत्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढला. त्यांनी हेलिकॉप्टरमधून उडी मारून सर्वांचे आभार मानले.
यावेळी टॉम क्रूझ म्हणाला, 'आम्ही दक्षिण आफ्रिकेत मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग भाग १ आणि २ चे शूटिंग करत आहोत. तुमचे आभार मानल्याशिवाय मला हे वर्ष संपवायचे नाही. Top Gun: Maverick च्या यशाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. नेहमीप्रमाणेच आम्हाला तुमचे मनोरंजन करू दिल्याबद्दल धन्यवाद. हा आयुष्यभरासाठी मिळालेला सन्मान आहे. मी इतक्या उंचीवर आहे, मला कामाला लागायचे आहे. आम्हाला हे शूट पूर्ण करायचे आहे. सर्वांना ही सुट्टी आनंदी आणि सुरक्षित जावो. आपण चित्रपटगृहात भेटूया.'
टॉम क्रूझचा चित्रपट २६ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.