Mandira Bedi Career Instagram @mandirabedi
मनोरंजन बातम्या

Mandira Bedi Struggle: माझी मेहनत दिसत नाही, कपडे दिसतात; पहिली क्रीडा समीक्षक मंदिरा बेदीचा संघर्ष

Mandira Bedi Birthday: अभिनेत्री मंदिरा बेदीचा आज 51वा वाढदिवस आहे.

Pooja Dange

मंदिराचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला तिची चुणूक दाखविण्यासाठी खूप संघर्ष आणि टीकेचा सामना करावा लागला. जेव्हा सोशल मीडियाचा ट्रेंडही नव्हता तेव्हापासून ती ट्रॉलिंगची शिकार झाली होती. पण मंदिराने प्रत्येक वेळी ट्रोल्सचा खंबीरपणे सामना केला. यामुळेच आज तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'शांती'मधील मंदिराची व्यक्तिरेखा ठाम उद्दिष्ट असलेल्या एका साध्या मुलीची होती. 2003 मध्ये जेव्हा तिने क्रिकेट शो करायला सुरुवात केली तेव्हा ती मॉर्डन आणि स्टायलिस्ट लुकमध्ये दिसली. तिच्या सूत्रसंचालनचे खूप कौतुक झाले, परंतु यासाठी तिला विनाकारण टार्गेट देखील करण्यात आले.

तिच्या कपड्यांवर टिप्पण्या केल्या गेल्या. तिने तिच्या कपड्यांसह शोमध्ये खूप ग्लॅमर आणले आहे, ज्यामुळे खेळाचे गांभीर्य कमी होत आहे, असे लोक म्हणत होते. होस्टिंग दरम्यान तिला देण्यात आलेल्या वागणुकीबाबत मंदिरा एका मुलाखतीत म्हणाली होती की, मी माझ्या कामासाठी खूप मेहनत करते, पण लोकांना फक्त माझ्या ब्लाउजच्या पट्ट्या दिसतात.

मंदिरा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेकवेळा तिला तिच्या फोटोंमुळे ट्रोलही व्हावे लागते. २०२० मध्ये मंदिराने मुलगी तारा दत्तक घेतली आणि त्याबद्दल माहिती दिली. तेव्हा ट्रोलला आणखी एक कारण सापडले, तिने मुलीला रस्त्यावरून आणि कचऱ्यातून उचलेल असे ट्रोलर्सनी म्हटले. तर मंदिराने तिचे पीआर पॉलिश करण्यासाठी मुलगी दत्तक घेतल्याचेही अनेकांनी म्हटले.

मंदिराने तिच्या करिअरमध्ये मालिका, होस्टिंग तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2021 मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या शिष्टाचार आणि कपड्यांमुळे तिच्यावर जोरदार टीका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: कमी मतं नाहीतर कुटुंब कारण ठरलं? अवेज दरबार बिग बॉस १९ च्या घराबाहेर पडण्याचं वेगळंच गुपित समोर आलं

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

SCROLL FOR NEXT