'The Kapil Sharma Show' विरोधात FIR दाखल; कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप! Instagram/@kapilsharma
मनोरंजन बातम्या

'The Kapil Sharma Show' विरोधात FIR दाखल; कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप!

सोनी टीव्हीच्या दबंग शो 'द कपिल शर्मा शो' विरोधात मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात एफआयआर FIR नोंदवण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : सोनी टीव्हीच्या दबंग शो 'द कपिल शर्मा शो' विरोधात मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात एफआयआर FIR नोंदवण्यात आला आहे. हा एफआयआर शोच्या एका भागाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यात कलाकार न्यायालयात सादर करताना स्टेजवर मद्यपान करताना दिसले होते.

हे देखील पहा-

याबद्दल तक्रारदाराने आरोप केला आहे की, कलाकारांनी कोर्टरूमचा अपमान केला आहे. द कपिल शर्मा शोच्या विरोधात तक्रार करणारी व्यक्ती व्यवसायाने वकील आहे. तिने शिवपुरी जिल्ह्याच्या सीजेएम न्यायालयात 'द कपिल शर्मा शो'विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

या तक्रारप्रकारणी, 1 ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. वकिलांनी कपिल शर्माच्या शो वर आरोप करत म्हणले, "सोनी टीव्हीवर येणारा शो 'द कपिल शर्मा शो' खूप विचित्र आहे. तो महिलांवर विचित्र टिप्पणी करतो. एका एपिसोडमध्ये, स्टेजवर कोर्ट रूम उभारण्यात आली होती आणि कलाकार तिथे सार्वजनिकरित्या मद्यपान करताना दिसले. "

वकिलाने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे, “हा न्यायालयाचा अवमान आहे. म्हणूनच मी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. अशी ढिसाळपणा दाखवणे थांबले पाहिजे. " ही तक्रार, 19 जानेवारी 2020 रोजी आलेल्या एका भागाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आली आहे, ज्याचे रिपीट टेलीकास्ट 24 एप्रिल 2021 रोजी दाखवण्यात आले.

वकिलांनी दावा केला की, न्यायालयात दाखवलेले एक पात्र पूर्णपणे नशेत होते. वकिलाच्या मते, असे करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

BEL Recruitment: इंजिनिअर आहात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; BEL मध्ये भरती, अर्ज कसा करावा?

Jaya Bachchan: तोंड बंद कर आणि फोटो काढा...; सनी देओलनंतर जया बच्चन यांनी पॅप्सना फटकारले, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

SCROLL FOR NEXT