Yash Chopra's wife Pamela Chopra passes away Saam TV
मनोरंजन बातम्या

Yash Chopra's wife Passes Away: दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांचे निधन

Yash Chopra's wife Pamela Chopra Passes Away: पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

Pooja Dange

Singer- Film Writer And Producer Pamela Chopra Dies: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. पामेला चोप्रा यांनी वयाच्या ७४ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले आहे. पामेला दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी, आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांची आई तर राणी मुखर्जीची सासू होती.

यशराज फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट पामेला यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेची माहिती दिली आहे.

पामेला चोप्रा आणि यश चोप्रा यांचे १९७० साली पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. त्यांचे अरेंज मॅरेज झाले होते. यश चोप्रा यांच्या निधनानंतर ११ वर्षांनी पामेला यांनी जगाचा निरोप घेतला.

पामेला चोप्रा पार्श्वगायिका होता. तसेच त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. सिनेमा जगतातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. यश चोप्रा यांच्या चित्रपटातील संगीत निर्मितीत त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. पामेला चोप्रा यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी फक्त त्यांच्या पतींच्या चित्रपटासाठीच गायन केले आहे.

१९९३ साली आलेला चित्रपट 'आईना'ची निर्मिती त्यांनी स्वतः केली होती. पामेला यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि प्रोफेशन रायटर तनुजा चंद्रा यांच्यासह १९९७ साली आलेला हिट चित्रपट 'दिल तो पागल है'चे स्क्रिप्ट लिहिले होते.

पामेला चोप्रा यशराज यांच्या डॉक्युमेंट्री सीरीज 'द रोमांटिक्स'मध्ये दिसल्या होत्या. या सीरीजमध्ये त्यांनी पती यशराज यांचा प्रवास आणि यशराज फिल्म्सची लिगसी याविषयी बरेच काही सांगितले होते. पामेला चोप्रा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

SCROLL FOR NEXT