फसवणुकीच्या गुन्ह्यात चित्रपट निर्माता पराग सांघवीला अटक Saam Tv
मनोरंजन बातम्या

फसवणुकीच्या गुन्ह्यात चित्रपट निर्माता पराग सांघवीला अटक

तक्रारदार यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे १३ कोटी ७४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

सूरज सावंत

मुंबई - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चित्रपट निर्माता पराग सांघवी याला एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तक्रारदाराने २०१३ मध्ये कमला लॅडमार्क ग्रुपच्या सिस्टर्स कंपनी नामे कमला लॅडमार्क इन्फ्रा आणि कमला लॅडमार्क प्रॉपर्टीज यांच्याकडून टर्नर रोड, बांद्रा, मुंबई याठिकाणी 3 व्यावसायिक फ्लॅट खरेदी केले होते.

हे देखील पहा -

या फ्लॅट मधील एक फ्लॅट फिर्यादी यांनी कमला लॅडमार्क ग्रुपच्या सिस्टर्स कंपनी आणि आरोपी जितेंद्र रमेश जैन व पराग मधुसूदन सांघवी संचालक असलेल्या अम्बारा इंटरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीस, तसेच इतर दोन फ्लॅट मेटालिका प्रा. लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिले होते.

हे फ्लॅट भाड्यावर घेतले असताना कमला लॅडमार्क ग्रुपच्या कमला लॅडमार्क प्रॉपर्टीज या कंपनीने ते तिसऱ्या व्यक्तीला विकले. या प्रकरणी तक्रारदार यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे १३ कोटी ७४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून पराग संघवी याला अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT