Filmfare Awards Winner Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Filmfare Awards 2022: दाक्षिणात्य फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये पुष्पासह अनेक चित्रपटांचा जलवा

दाक्षिणात्य चित्रपटाचा ६७ वा फिल्मफेअर अवॉर्ड्स ९ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी अनेक चित्रपटांनी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटाचा ६७ वा फिल्मफेअर अवॉर्ड्स ९ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत आपली छाप पाडणारा चित्रपट म्हणजे पुष्पा: द राईज सोबतच सूरराई पोत्रु, अय्यप्पनम कोशियुम यांसह अनेक चित्रपटांनी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहेत. तसेच यावेळी कन्नड चित्रपटातील सुपरस्टार पुनित राजकुमारला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (Marathi Entertainment News)

हा पुरस्कार तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड चित्रपट उद्योगातील अभिनेते, अभिनेत्री आणि तंत्रज्ञांनाना त्यांच्या संबंधित चित्रपटांत खास कामगिरी केल्याबद्दल कामाची पोच पावती पुरस्काराच्या माध्यमातून दिली आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला नव्हता. पण तब्बल दोन वर्षानंतर हा पुरस्कार सोहळा चांगलाच धुमधडाक्यात पार पडला आहे. (Breaking Marathi News)

दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कार २०२२ च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

तमिळ

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - सुरिया (सूरराई पोत्रु)

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - लिजोमोल जोस (जय भीम)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - जय भीम

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुधा कोंगारा (सुरराई पात्रु)

तेलगू

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - अल्लु अर्जुन (पुष्पा: द राईज)

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - साई पल्लवी (लव्ह स्टोरी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - पुष्पा द राईज

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुकुमार बंद्रेद्दी (पुष्पा: द राईज)

कन्नड

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - धनंजय (बदावा रास्कल)

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - यज्ञा शेट्टी (Act 1978)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - Act 1978

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राज बी शेट्टी (गरुड गमना वृषभ वाहना)

मल्याळम

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - बिजू मनॉन (अय्यप्पनुम कोशियम)

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - निमीशा संजयन (द ग्रेट इंडियन किचन)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - अय्यप्पनम कोशियम

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सेन्ना हेगडे (थिंकलझचा निश्चितम)

फिल्मफेअर अवॉर्ड्स 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता झी तेलुगू आणि झी कन्नडवर या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे. तर तेलुगू आणि मल्याळम भाषेत झी तेलुगु आणि झी केरलम वर २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

SCROLL FOR NEXT