Fauji Marathi Movie canva
मनोरंजन बातम्या

Fauji Marathi Movie: सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची जोडी जमली, 'फौजी'मधून येतायेत भेटीला

Fauji Movie Casting: भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारीत 'फौजी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फौजीच्या माध्यमातून दिगदर्शक सैनिकांच्या जीवनातील संघर्ष सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्या पहायला मिळतात. चित्रपटेच्या कथेसोबत हल्ली फ्रेश जोडी ही तितकीच महत्त्वाची ठरू लागली आहे. या गोष्टी लक्षात येताच चित्रपटाचा दिग्दर्शक नव्या जोड्यांना प्राधान्य दोतो. मराठी रुपेरी पडद्यावर अशीच आणखी वेगळी एक जोडी लवकरच पहायला मिळणार आहे. ती जोडी आहे सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची. ‘फौजी’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी ‘फौजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘फौजी’ चित्रपाची निर्मिती मातृपितृ फिल्म्स आणि घनशाम येडे यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकत्र आले असून देशभक्तीची पार्श्वभूमी असलेल्या ‘फौजी’ चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे खरंच आम्हाला सुखावणारी बाब असल्याचे दोघं सांगतात.‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना या दोघांनी व्यक्त केल्या.

भारतीय सैनिक हातात बंदूक घेऊन आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात. अशा निडर सैनिकांचा जीवन प्रवास दिगदर्शक या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दोघांसोबाबत अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे,अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत.

चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे आहेत. सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, एस.पी. गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, उद्धव गावडे, गणेश गुंजाळ, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे, प्रविण बुरुंगे याचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT