प्रेमात बहाणा कसला...सोनाक्षी-जहीरनं शेअर केली लव्ह'स्टोरी', तुम्ही बघितलीत का?
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal canva

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal : प्रेमात बहाणा कसला...सोनाक्षी-झहीरनं शेअर केली लव्ह'स्टोरी', तुम्ही बघितलीत का?

Sonashi Sinha Zaheer Iqbal Photos : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी आणि पती झहीर इक्बाल यांच्या रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. विकेंडला सोनाक्षीनं घेतला शूटिंगमधून ब्रेक.
Published on

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले आहेत. आता या दोघांच्या रोमँटिक फोटोनं सोशल मीडियावर प्रेमवर्षाव केला आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टास्टोरीवर झहीरसोबतचा एक झक्कास फोटो शेअर केला आहे. दोघेही कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी असून, सोनाक्षीने झहीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. नवी नवरी झहीरच्या खूपच प्रेमात असल्याचे दिसतेय.

प्रेमात बहाणा कसला...सोनाक्षी-जहीरनं शेअर केली लव्ह'स्टोरी', तुम्ही बघितलीत का?
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal: सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला एक महिना पूर्ण, फिलिपिन्समध्ये सेलिब्रेशन; फोटो पोस्ट करत म्हणाली...

दबंग गर्ल सोनाक्षी तिच्या लग्नाच्या आधीपासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या आणि झहीरच्या रिलेशनशिपला नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. मात्र दोघांमधील प्रेमाचं नातं घट्ट असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर देखील दिलंय. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षी तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे. फोटोला एक हार्ट इमोजी आणि एक प्लेन इमोजी देत मस्त कॅप्शन दिली आहे.

सोनाक्षी आणि झहीर त्यांच्या लग्नानंतर अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. खेल खेल में चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सोनाक्षीने निळ्या रंगाची साडी आणि झहीरने निळ्या रंगाचे कपडे घालत ट्विनिंग केलं होतं. सोनाक्षी आणि झहीर यांच्यामधील प्रत्येक रोमँटिक क्षण सोनाक्षी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.

सोनाक्षी आणि झहीर ही जोडी बॉलिवूडच्या रोमँटिक कपलपैकी एक मानली जाते. लग्नाच्या दिवशी सोनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या दोघांमधील महत्त्वाचे क्षण आणि तिच्या मनातील झहीरसाठीचे प्रेम तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होते. सोनाक्षीच्या लग्नाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा देखील पूर्णपणे पाठिंबा असल्याचे अनेकवेळा स्पष्ट केले होते. लग्नानंतर सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बाल अत्यंत आनंदी दिसत आहेत. त्यासोबतच दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.

Edited By: Nirmiti Rasal

प्रेमात बहाणा कसला...सोनाक्षी-जहीरनं शेअर केली लव्ह'स्टोरी', तुम्ही बघितलीत का?
Sonakshi Sinha On Wedding : सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत लग्न का केलं ?लग्नानंतर स्वत:च केला खुलासा
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com