Fatima Sana Shaikh On Epilepsy  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fatima Sana Shaikh: 'दंगल गर्ल' फातिमा शेखला आहे 'हा' गंभीर आजार, सोशल मीडियावर करतेय या आजाराविषयी जनजागृती

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फातिमा एपिलेस्पीविषयी जनजागृती करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fatima Sana Shaikh On Epilepsy: बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या तिच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. फातिमा सना शेखने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर एपिलेप्सीबद्दल पोस्ट केली होती.

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फातिमा एपिलेस्पीविषयी जनजागृती करत आहे. खुद्द फातिमा सना शेखलाही या आजाराने ग्रासले आहे. नोव्हेंबर हा एपिलेप्सी जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. फातिमा सना शेख या आजारकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. (Social Media)

अभिनेत्री फातिमाने एपिलेस्पीवर तिचे मत व्यक्त केले आहे. तसेच लोकांच्या कथा, संघर्ष आणि आव्हाने सर्वांना समोर यावे यासाठी तिने तिच्या सोशल मीडियावर लोकांशी संभाषण सुरू केले. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने लिहिले की, 'हा एपिलेप्सी महिना आहे. तुमची कथा, संघर्ष, आव्हाने शेअर करा.' 'दंगल' चित्रपटादरम्यान तिला या आजाराविषयी समजल्याने तिने सांगितले. (Movie)

तुला याबद्दल केव्हा कळले, असे एका फॉलोअरने तिला विचारले असता, अभिनेत्री म्हणाली, “दंगलच्या शूटिंगदरम्यान मला एपिलेप्सी झाल्याचे मला समजले. मला प्रॅक्टिसदरम्यान स्ट्रोक आला आणि थेट हॉस्पिटलमध्येच माझे डोळे उघडले. पहिली ५ वर्षे मी याकडे दुर्लक्ष करत राहिले. पण आता मला काळजी घ्यावी लागते. (Actress)

फातिमा सना शेखने असेही सांगितले की, ती कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करण्याआधी त्यांना ती तिच्या या आजाराविषयी सांगते. 'मला नेहमीच दिग्दर्शकांचे सहकार्य मिळत आले आहे. या आजाराबाबत समजल्यानंतर सर्वांनी मला साथ दिली. याने माझ्या मनातली भीती संपली आहे. मात्र याबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्याची गरज आहे", असेही फातिमा म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT