Shah Rukh Khan - Suhana Khan Sharing Screen Soon Saan TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan - Suhana Share Screen : बाप - लेक एकत्र... सुहाना शाहरुखसोबत करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण

Suhana Khan's Debut In Bollywood : शाहरुख खान लेक सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan - Suhana Khan Sharing Screen : बॉलिवूडचा किंग 'शाहरुख खान' हा भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. किंग खानने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. गेल्या काही दिवसांपासून, शाहरुख खानच्या डंकीनंतर पुढे काय ? अशा चर्चांना उधाण आले आहे. शाहरुख खान लेक सुहाना खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

पिंकवीलाच्या वृत्तानुसार, शाहरुख खान लेक सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुहाना खान शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रेड चिलीस निर्मित आणि सिद्धार्थ मॅरफ्लिक्ससह हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

चित्रपटाबाबत आता एक माहिती समोर आली आहे. किंग खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय घोष करणार आहे. सुजोय घोष हे 'कहानी', 'कहानी २', 'बदला' या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. याआधीही शाहरुख खान आणि सुजोय घोष यांनी एकत्र काम केले होते.

सुजोय घोष दिग्दर्शित 'बदला' चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानने केली होती. ही जोडी आता पुन्हा नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सुजोय घोषही नवीन शैलीत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

पिंकवीलाच्या वृत्तानुसार, रेड चिलीस आणि मॅरफ्लिक्सबद्दल अशी माहिती समोर येत आहे की, शाहरुख खान हा असा निर्माता आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपटाशी स्पर्धा करायला आवडते. तर सिद्धार्थ आनंद हा अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद अॅक्शन चित्रपटाची एकत्र निर्मिती करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे यात वादच नाही.

सुहाना खानचे मोठ्या पडद्यावर पदार्पण

सुहाना खान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यााधी झोया अख्तरच्या 'द अर्चिस' या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटातात शाहरुख खानची भूमिका आणि स्क्रीनटाइम हा डिअर जिंदगीवर आधारित असण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचे लेखन सुरू झाले असून फायनल पॉलिशिंग बाकी आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनल जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रेड चिलीस् शाहरुख खानच्या नव्या पिढीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख-सुहाना व्यतिरिक्त या चित्रपटाची कास्टिंग सुरु आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुजोयने यांनी 'बदला' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूसोबत काम केले आहे. हा चित्रपट हिट ठरला तेव्हापासूनच शहारुख खान सुजोयच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०२४मध्ये पुन्हा सिद्धार्थ आनंदसोबत काम करायला शाहरुख खान सज्ज आहे. 'टायगर' आणि 'पठान'नंतर आता शाहरुखचा नवीन अॅक्शन थ्रिलर चित्रपट २०२४मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT