Rajkummar Rao-Patralekha Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Rajkummar Rao-Patralekha Viral Video: राजकुमार राव आणि पत्रलेखाचा रोमॅंटिक अंदाज पाहिलात का?; फराह खानने केला व्हिडीओ शेअर

Viral Video: सध्या राजकुमार राव आणि पत्रलेखाचा रोमॅंटिक अंदाजातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Rajkummar Rao-Patralekha Viral Video

राजकुमार राव आणि पत्रलेखा ही जोडी बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. या दोघांनीही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकले आहेत. सध्या या दोघांचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या एका व्हिडीओमुळे त्यांची तुफान चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर फराह खानने शेअर केलेल्या व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खानने राजकुमार राव आणि पत्रलेखाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. फराह खान, हुमार कुरेशी, साकिब सलीम, राजकुमार राव आणि पत्रलेखा एका पार्टीमध्ये स्पॉट झाले होते. त्या पार्टीतला एक रोमँटिक व्हिडीओ फराह खानने शेअर केला आहे.

फराहने शुट केलेल्या व्हिडीओमध्ये, राजकुमार राव आणि पत्रलेखा एका ठिकाणी उभे दिसत आहेत. त्याचवेळी साकिब आणि हुमा कुरेशीने त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर ते दोघेही हैराण झाल्याचे दिसत आहे. राजकुमार राव, पत्रलेखा, साकेत सलीम, हुमा कुरेशी आणि फराह खान हे खूप चांगले सेलिब्रिटी मित्र आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र स्पॉट सुद्धा केले आहेत. फराह खानने व्हिडीओ शेअर करताना, ‘Mad night out with Mad friends’ अशा आशयाचं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

गेले अनेक वर्ष या जोडीने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १५ नोव्हेंबर २०२१ ला या दोघांनी लग्नगाठ बांधली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिटीलाइट्स’ चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने चित्रपटामध्ये क्रिटेटपटू महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT