Farah Khan Shopping On Street Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farah Khan Shopping On Street: बापरे, ट्रायपॉड इतका महाग!, लक्झरी ब्रँड सोडून रस्त्यावर शॉपिंग करताना स्पॉट झाली फराह खान, Video Viral

Farah Khan News: बॉलिवूड दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान सुद्धा स्ट्रीट शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी तिचा साधेपणा नेटकऱ्यांना फारच भावला.

Chetan Bodke

Farah Khan Shopping On Street

स्ट्रीट शॉपिंग करण्याचा आनंद एक वेगळाच आहे. स्ट्रीट शॉपिंगचा आनंद लुटताना आपल्याला काही वेळा सेलिब्रिटीही दिसून येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सारा अली खान स्ट्रीट शॉपिंग करताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. आता तिच्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान सुद्धा स्ट्रीट शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी तिचा साधेपणा नेटकऱ्यांना फारच भावला असून सध्या तिच्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

कॉरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खानचा स्ट्रीट शॉपिंग करतानाचा व्हिडीओ दिग्दर्शक पुनिथने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शकांनी व्हिडीओ शेअर करताच अवघ्या काही वेळातच तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, फराह तिच्या अलिशान कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी तिने एका अलिशान मॉलमध्ये किंवा अलिशान शोरुममध्ये शॉपिंग करण्याचे निवडले नसून थेट स्ट्रीट शॉपिंगचाच तिने मार्ग निवडला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, फराहने तिची अलिशान कार रस्त्याच्या कडेला उभी केली आहे. रस्त्यावर शॉपिंग करणाऱ्या वस्तू विक्रेत्याला बोलावून त्याला ट्रायपॉडची किंमत विचारते. ज्यावेळी विक्रेत्याने तिला ट्रायपॉची किंमत सांगितली तेव्हा ती खूपच महाग आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्या विक्रेत्याने तिला ट्रायपॉडची किंमत ३९० रुपये इतकी सांगितली, फराहने विक्रेत्याला ५०० रुपयाची नोट देत ११० रुपये परत दे, असं ही बोलली आहे. फराहने यावेळी BMW 7 Series या अलिशान कारमध्ये बसून स्ट्रीट शॉपिंग करताना ती दिसली. कोट्यवधींच्या कारमध्ये बसून फराहने शॉपिंग केल्यामुळे तिच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

फराहच्या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्मान खुराना, आशुतोष गोवारीकर सह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कौतुक केलं आहे. दिग्दर्शक पुनिथने शेअर केलेल्या व्हिडीओवर युजर्सने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फराह खानबद्दल बोलायचे तर, ती एक बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शिका,निर्माती असून तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. फराहने आतापर्यंत १०० हून अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शनही केले आहे. अनेक टेलिव्हिजन शोची फराहने होस्टिंग देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early symptoms of blood cancer: ब्लड कॅन्सरमध्ये रात्रीच्या वेळेस रूग्णांना शरीरात जाणवतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Palak Tiwari: हॉट अन् बोल्ड श्वेता तिवारीची लेक, फोटोंनी वाढवलाय इंटरनेटचा पारा

Akkalkuwa News : गावात जायला आजही रस्ता नाही; आदिवासी बांधवाची रोजची पायपीट थांबेना

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक

HBD Bharti Singh : भारती सिंहनं कसं घटवलं वजन? वाचा सीक्रेट डाएट प्लान

SCROLL FOR NEXT