Shah Rukh Khan Meet Fan In Mannat Instagram
मनोरंजन बातम्या

King Khan Fan Aakash Pillay: शाहरुखचा जबरा फॅन; गर्दीतून थेट पोहोचला ‘मन्नत’मध्ये; ३३ दिवसांच्या मेहनतीची किंग खानकडून दखल

Shah Rukh Khan Fan News: आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी एक महिन्याच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर किंग खानच्या चाहत्याला भेटण्याची संधी मिळालीय.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Meet Fan In Mannat

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. शाहरुखचे चाहते एकट्या भारतातच नाही तर जगभरात आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळ त्याच्या चाहत्यांची गर्दी आपल्याला कायमच पाहायला मिळते. शाहरुखला भेटण्यासाठी, त्याची खास आयकॉनिक स्टेप पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच आतुर असतात.

सध्या शाहरुखच्या एका चाहत्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी त्याने तब्बल एक महिना वाट पाहिली. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर आणि खडतर प्रवास करत चाहत्याला किंग खानला भेटण्याची संधी मिळाली. दरम्यान, किंग खानच्या चाहत्याने तो प्रवास कसा केला, त्याची आणि किंग खानची भेट कशी झाली, ही सर्व माहिती त्याने ब्लॉगच्या माध्यमातून सांगितली आहे.

आकाश पिल्लईने शाहरुखला भेटण्यासाठीचा प्रवास २९ ऑगस्टपासून सुरु केला होता. यावेळी त्याच्यासोबत एक बोर्डसुद्धा असायचा. हा बोर्ड आकाश जिथे जाईल त्याच्यासोबत राहायचा. आकाशच्या हातात असलेल्या या बोर्डावर ‘ 10 Days Of Waiting SRK’ असं लिहिलेलं असायचं. जस जसे दिवस पुढे जायचे तसतसा तो आकडा पुढे सरत जायचा. जरीही किंग खानला भेटायला एक महिना लागला तरी त्याचा कुठेही आत्मविश्वास डगमगला नाही. त्याला सोशल मीडियावर वाढता प्रतिसाद पाहता त्याने हार मानली नाही.

जिथे शाहरुख तिथे आकाश जाण्याचा प्रयत्न करायचा, त्याने शाहरुखला भेटण्यासाठी मुंबई ते चेन्नई सुद्धा प्रवास केला होता. पण अखेर मोठ्या प्रदिर्घ काळानंतर त्याला शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली. मन्नत बंगल्यातील शाहरुखचा आणि आकाशच्या भेटीचा फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तो फोटो शेअर करताना त्याने किंग खानचा डायलॉग कॅप्शन म्हणून दिला आहे. किंग खानसोबतचा फोटो शेअर करताना तो म्हणतो, ‘अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है.’

३३ दिवस वाट पाहिल्यानंतर शाहरुखच्या मॅनेजरने त्याला भेटण्याची वेळ दिली. अनेकदा या भेटीची वेळ पुढे ही ढकलण्यात आली, पण शेवटी त्याला ३३ व्या दिवशी रात्री आवडत्या सेलिब्रिटीला भेटायला मिळालं. आकाशने सोशल मीडियावर एक रिल शेअर केली, त्या रिलमध्ये किंग खानच्या मॅनेजरचे आभार मानले. यावेळी त्याने किंग खानच्या स्वभावावर देखील भाष्य केलं आहे. शाहरुखला भेटण्याचे स्वप्न आकाशचे पुर्ण झाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT