Dhruv Rathee  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी झाला बाप; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो

Dhruv Rathee become father : ध्रुव राठी बाप झाला आहे. ध्रुव राठीच्या जर्मन पत्नीने सुंदर मुलाला जन्म दिला आहे .

Vishal Gangurde

नवी दिल्ली : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी बाप झाला आहे. ध्रुव राठीच्या जर्मन पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. ध्रुवने शनिवारी सांयकाळी बाप झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. ध्रुव व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूबशिवाय सोशल मीडियावर देखील खूप प्रसिद्ध आहे. ध्रुवचे एक-एक व्हिडिओ लाखो लोक पाहतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ध्रुवने मुलाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ध्रुव मुलाला मांडीवर घेतलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये बाळाचा फोटो आहे. दोन फोटो शेअर करत म्हटलं की, 'माझ्या लहान मुलाचं या जगात स्वागत आहे'.

ध्रुवने जुलै महिन्यात पत्नीच्या बेबी बंपसोबत फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्याने सप्टेंबरमध्ये आमचं बाळ जगात पाऊल ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. नऊ जुलै रोजी ध्रुव आणि त्याची पत्नी जुलीने इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करत ती गरोदर झाल्याची सांगितलं होतं. त्यावेळी देखील दोन फोटो शेअर केले होते. एका फोटोमध्ये दोघे उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याची पत्नी जुलीचा बेबी बंप दिसत आहे.

ध्रुवची पत्नी जुली ही जर्मनीची आहे. दोघांची पहिली भेट २०१४ साली झाली होती. त्यावेळी ध्रुवचं वय १९ वर्ष होतं. पहिल्या भेटीदरम्यान जुली ही शाळेत जात होती. दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी २०२१ साली लग्न केलं. ध्रुव आणि जुलीने ऑस्ट्रियामध्ये लग्न केलं होतं.

कोण आहे ध्रुव राठी?

ध्रुव राठी हा हरियाणाच्या रोहतक येथील आहे. त्याचा जन्म ८ ऑक्टोबर १९९४ साली झाला. ध्रुवने प्राथमिक शिक्षण रोहतकमध्ये झालं. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी जर्मनीला गेला. राठी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. यानंतर त्याने जर्मनीमधूनच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. ध्रुव राठीन युट्यूबवरून वेगवेगळ्या मुद्यावर व्हिडिओ तयार करत असतो. त्यात सामाजिक मुद्यांचा अधिक समावेश असतो. ध्रुवला इन्स्टाग्रामवर १२.५ मिलियन जण फॉलो करतात. तर युट्युबला त्याच्या चॅनलला २५ मिलियन सबस्क्रायबर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT